'राज्यात एकही OBC नेता नाही, पंकजा मुंडेंनी नवीन पक्ष काढावा'

'जर पंकजा मुंडे यांनी पक्ष काढला तर, त्या ज्या नेत्यांच्या मागे फिरत आहेत, तेच नेते मुंडे यांच्या मागे फिरतील.'
Pankaja Munde
Pankaja MundeSaam TV

औरंगाबाद : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना वारंवार डावललं जात असून त्यांनी आत्ता नवीन पक्षाबाबत विचार करावा, असा सल्ला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी दिला आहे. महाराष्ट्रामध्ये आताा एकही ओबीसी नेता राहिला नाही. त्यामुळे समाजासाठी पंकजा मुंडे यांनी हे पाऊल उचलावे असंही जलील म्हणाले.

MIM ला देखील एका चांगल्या मित्राची गरज आहे, त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जर पक्ष काढला तर, त्या आत्ता ज्या नेत्यांच्या मागे फिरत आहेत. तेच नेते पंकजा मुंडे यांच्या मागे फिरतील. तसंच ज्या गोपीनाथ मुंडे, लालकृष्ण अडवाणी यांनी भाजप पक्ष देशात वाढवला तो नरेंद्र मोदी किंवा अमित शहा (Narendra Modi or Amit Shah) यांनी वाढवला नाही असं म्हणत त्यांनी मोदी शहांवरती टीकाही केली.

हे देखील पाहा -

दरम्यान, जालन्यात काल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात झालेल्या जल आक्रोश मोर्चावरही जलील यांनी टीका केली ते म्हणाले, 'हा जल आक्रोश मोर्चा नाही तर जल्लोश मोर्चा होता. ज्या ज्या ठिकाणी यांची सत्ता होती, हे मुख्यमंत्री होते त्या त्या ठिकाणी हे मोर्च्या काढत आहे, जे दानवे इतक्या वर्ष खासदार म्हणून जालन्यात काम करतात त्याचं दानवेंवर दोनशे दोनशे रुपये देवून याठिकाणी महिला आणण्याची वेळ आली असल्याची टीकाही जलील यांनी केली.

हा मोर्चा पाण्यासाठी आहे की जल्लोष करण्यासाठी हे आता दानवे यांनी सांगावं असंही जलील म्हणाले. राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएम च्या दोन मतावरून आरोप -प्रत्यारोप केल्या जात त्यावर जलील यांनी जे निवडून आलेल्या उमेदवारांना आमची दोन मते गेली असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com