बर्फवृष्टी झाली तरी तापमान 7 अंशावर? हवामान मापक यंत्र नसल्याने तापमानाचा पारा भगवान भरोसे

दवबिंदू गोठून हिमवृष्टी झाली तरीही कृषी विज्ञान केंद्रातील हवामान तज्ञांच्या मते 7 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज दिला होता. मात्र पर्यावरण अभ्यासक व हवामान तज्ञांच्या मते तापमान 2 ते 3 सेल्सियस अंश खाली आल्यावरच दव बिंदू गोठु शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बर्फवृष्टी झाली तरी तापमान 7 अंशावर? हवामान मापक यंत्र नसल्याने तापमानाचा पारा भगवान भरोसे
बर्फवृष्टी झाली तरी तापमान 7 अंशावर? हवामान मापक यंत्र नसल्याने तापमानाचा पारा भगवान भरोसेदिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात आठवडाभरापासून हवामानात मोठा बदल झाला आहे. अवकाळी पावसानंतर सातपुडा पर्वत रांगेतील दाब, वालंबा, तोरणमाळ परिसरात दवबिंदू गोठून हिमवृष्टी झाल्याचे पाहावयास मिळाले तरीही नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रातील हवामान तज्ञांच्या मते 7 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज देण्यात आला होता. परंतु पर्यावरण अभ्यासक व हवामान तज्ञांच्या मते तापमान 2 ते 3 सेल्सियस अंश खाली असल्यावरच दव बिंदू गोठु शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे अतिदुर्गम भाग असलेल्या या भागात कृषी हवामान विभाग (Department of Agricultural Meteorology) जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मोजमाप केलेल्या हवामानाचा अंदाज देऊन 100 पेक्षा जास्त किलोमीटर लांब तोरणमाळ, दाब येथे राहणाऱ्या नागरिकांची दिशाभूल करत आहे, तसेच शेती पिकांचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे या भागात हवामान मापक यंत्रच नसल्याने भविष्यात चुकीच्या हवामानाच्या अंदाजामुळे वेगळे दुष्परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.

बर्फवृष्टी झाली तरी तापमान 7 अंशावर? हवामान मापक यंत्र नसल्याने तापमानाचा पारा भगवान भरोसे
BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे

गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात कडाक्याची थंडी असल्याने राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ येथेही दवबिंदू गोठून हिमवृष्टी (Snowfall) झाल्याचे समोर आले आहे. दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देत असतात परंतु तोरणमाळ येथेही हवामान मापक यंत्रणा नसल्यामुळे तापमानाचा पारा नेमका किती अंश सेल्सिअस हे सांगणे कठीण आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सपाटी भागात आज नऊ अंश सेल्सिअस तापमान आहे तर सातपुडा पर्वतरांगेत त्यापेक्षा कमी तीन ते चार अंश सेल्सिअस तापमान कमी असेल असे भाकीत कृषी विज्ञान केंद्राच्या वेधशाळे तर्फे केले जाते.

हे देखील पहा -

सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही अनेक ठिकाणी पर्याप्त मोबाईल नेटवर्कची (Mobile) सुविधा नाही. अनेक आदिवासी गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सोबत हवामान मापक यंत्र ही नसल्याने बर्फाची चादर पसरल्यानंतरही तापमान किती अंश आहे हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने या परिसरात हवामान मापक यंत्र बसवून नागरिकांना योग्य हवामान अंदाज देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. सध्या तरी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीने (Cold) गरम कपडे व शेकोटीचा आधार घेणे एवढाच पर्याय आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com