...म्हणून अकोल्यातील हे नागरिक आयुक्तांना पाठवणार निमंत्रण पत्रिका

नगरसेवक लक्ष देत नसल्याने मनपा आयुक्त यांनी या प्रभागात येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी एक निमंत्रण पत्रिका छापून आयुक्तांना पाठण्यात येणार आहे.
...म्हणून अकोल्यातील हे नागरिक आयुक्तांना पाठवणार निमंत्रण पत्रिका
...म्हणून अकोल्यातील हे नागरिक आयुक्तांना पाठवणार निमंत्रण पत्रिकाजयेश गावंडे

अकोला - नगरसेवकाने प्रभागात विकासात्मक कामे न केल्याने येथील नागरिकांना आरोग्य धोक्यात टाकून जगावे लागत आहे. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 18 मधील ही समस्या आहे. याकडे नगरसेवक लक्ष देत नसल्याने मनपा आयुक्त यांनी या प्रभागात येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात या उद्देशाने मनपा आयुक्तांना एक निमंत्रण पत्रिका छापून त्यांना या समस्या दाखविण्यासाठी बोलावणार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. (Therefore, this invitation letter will be sent by the Citizens to Commissioner of Akola)

हे देखील पहा -

प्रभाग क्रमांक 18 मधील कमला नगर, बुद्ध नगरी, सागर कॉलनी, रूपचंद नगर, संदेश नगर या ठिकाणच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. जागोजागी पाणी साचलेले आहे, चिखल आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ते नाही. नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. घाण पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. सोबतच जागोजागी सांडपाणी जमा झालेला आहे. नाले तुडुंब भरलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी, रस्ते बनविण्यात यावे, पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी परिसरातिल नागरिक करीत आहे.

...म्हणून अकोल्यातील हे नागरिक आयुक्तांना पाठवणार निमंत्रण पत्रिका
उभ्या एसटी बसला कंटेनरची धडक, चालकासह प्रवाशी जखमी...

शहराच्या प्रवेशद्वारा जवळ असलेला हा परीसर विकासापासुन दुर्लक्षित आहे. हा प्रभाग चांगला आणि निरोगी व विकसनशील व्हावा, याकरिता निमंत्रण पत्रिका छापून महानगरपालिका आयुक्त यांना पाहणी करण्याकरता निमंत्रित करणार आहे. जेणेकरून या वार्डाच्या समस्या लवकरात लवकर निकाली निघतील, असा आशावाद येथील नागरिकांनी व्यक्त केलाय.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com