
Nanded: कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली होती. माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं होते.
यानंतर आता अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ‘माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर दावा केला आहे. आज सांयकाळी नांदेड जिल्ह्यातील कारेगांव इथे चव्हाण यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना चव्हाण यांनी आपला घातपात घडवण्याची भीती व्यक्त केली आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण...
"सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा, अशीही चर्चा सुरू आहे,” असं खळबळजनक खुलासा अशोक चव्हाण यांनी केला आहे.
तसेच याबद्दल पुढे बोलताना "जे कोणी हे सगळं करत आहे, त्यांना एवढंच सांगायचं आहे की, अशोक चव्हाणाचा जीव गेला तरी हरकत नाही, पण अशोक चव्हाण तुमच्या सारखा डुप्लीकेट आणि खोटं बोलून नेतृत्व करणारा नेता नाही. तुमच्यात नेतृत्व करण्याची जी चढाओढ चालली आहे, त्याबाबत आमची काहीही तक्रार नाही. आम्ही तुमचं नाव एकदाही घेत नाही," असेही ते म्हणाले आहेत.
अशोक चव्हाण यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसमध्ये (Maharashtra Congress) मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर कॉंग्रेस नेतेच नाराज असल्याची चर्चा रंगली आहे, त्यामुळे अशोक चव्हाण यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबद्दलच्या उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत...
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.