जालन्यात चोरट्यांची दहशत; बॅंकेत जाणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात फेकली मिर्चीपूड, अन्...

चोरट्यांनी एका व्यक्तीच्या डोळ्यात मिर्चीपूड फेकून रोकड लंपास केली.
जालन्यात चोरट्यांची दहशत; बॅंकेत जाणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात फेकली मिर्चीपूड, अन्...
Crime news updateSaam TV

जालना : येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दुचाकीवरुन एका व्यक्तीच्या डोळ्यात मिर्चीपूड फेकून ९० हजरांची रक्कम चोरी केलीय. सोमवरी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.औरंगाबाद-जालना महामार्गवर (Aurangabad-jalna highway) महानुभाव आश्रमजवळ रविंद्र पाटील हे प्राईम पेट्रोल पंपाची रक्कम बँकेत भरण्यासाठी जात होते. त्याचदरम्यान पाटील यांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी अडवलं. त्यानंतर चार चोरांनी पाटील यांच्या डोळ्यात मिर्चीपूड फेकून त्यांना मारहाण करत (Money Robbery) ९० हजाराची रोकड लंपास केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, पाटील आणि पेट्रोलपंप व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर (Police Fir Filed) बदनापूर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime news update
मुंबईत इमारतीच्या १४ व्या मजल्यावर भीषण आग!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविंद्र पाटील बदनापूर शहराजवळ असलेल्या प्राईम पेट्रोल पंपाची रक्कम बँकेत भरण्यासाठी औरंगाबाद -जालना महामार्गावरुन जात होते. त्यावेळी महानुभाव आश्रमजवळ त्यांच्या दुचाकीला चोरट्यांनी अडवलं. त्यानंतर चोरांनी पाटील यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून मारहाण केली. त्यानंतर चोरांनी पाटील यांच्या गळ्यातील बॅग हिसकावून ९० हजार रपये चोरले.

तसंच बॅगेत असलेले धानदेश व इतर कागद पत्रेही घेऊन चोरांनी पोबारा केला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना कोणतेही पुरावे सापडले नाहीत.पाटील व पेट्रोलपपं व्यवस्थापक यांच्या तक्रारीनंतर बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.