बापरे! पुण्यातून रायगडात पर्यटनासाठी यायचे अन् चोरी करून जायचे

रायगडात पर्यटनाच्या (Raigad Tourism) उद्देशाने येऊन घरफोड्या करणाऱ्या चार जणांपैकी दोन जणांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे पथकाने आवळल्या आहेत.
बापरे! पुण्यातून रायगडात पर्यटनासाठी यायचे अन् चोरी करून जायचे
बापरे! पुण्यातून रायगडात पर्यटनासाठी यायचे अन् चोरी करून जायचे राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगडात पर्यटनाच्या (Raigad Tourism) उद्देशाने येऊन घरफोड्या करणाऱ्या चार जणांपैकी दोन जणांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे पथकाने आवळल्या आहेत. इरफान रसूल शेख (30) आणि ऐलानसिंग श्यामसिग कल्याणी (31) दोन्ही राहणार पुणे असे अटक केलेल्या अट्टल चोरांची नावे आहेत. या आरोपींनी खोपोली, रसायनी, नेरळ पोलीस ठाणे हद्दीत नऊ गुन्हे केले आहेत. हे सर्व गुन्हे उघडकीस आले असून 11 लाख 8 हजार 350 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. इरफान रसूल याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून ऐलानसिंग हा गुरुवार पर्यत पोलीस कोठडीत आहे. या अट्टल चोराचे दोन साथीदार रावीसिंग कल्याणी आणि लखनसिग दुधाणी हे पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. अटक करण्यात आलेले हे आरोपी अट्टल गुन्हेगार असून 15 ते 20 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

बापरे! पुण्यातून रायगडात पर्यटनासाठी यायचे अन् चोरी करून जायचे
ऑनलाईन सेक्स रॅकेट चा भांडाफोड; मास्टर माईंडसह चार तरुणींना घेतलं ताब्यात

स्थानिक गुन्हे पथकाने पकडलेले आरोपी हे जिल्ह्यात पर्यटनास येत असत. पर्यटनाला आलेल्या ठिकाणी रेकीकरून त्या परिसरात घरफोड्या करून पसार होत असत. त्यामुळे जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या प्रमाण वाढले असून पोलिसांना चोरांचा थांगपत्ता लागत नव्हता. जिल्ह्यातील चोऱ्या, घरफोड्या उघडकीस आणण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे याच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांचे पथक तयार करण्यात आले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घरफोडी झालेल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा मागोवा घेतला. यावेळी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलच्या आधारे मालकाचा शोध घेतला. गुप्त बातमीदार, पुणे पोलीस यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे पथकाने वेषांतर करून मोटार सायकल मालकापर्यंत पथक पोहचून इरफान शेख याला ताब्यात घेतले. इरफान याला अटक केल्यानंतर त्याने ऐलानसिंग आणि रविसिग याना मोटार सायकल दिल्याचे कबूल केले. त्यानुसार ऐलानसिंग याला अटक केल्यानंतर रायगड जिल्ह्यात केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपिकडून 11 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बापरे! पुण्यातून रायगडात पर्यटनासाठी यायचे अन् चोरी करून जायचे
T-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात मोठा बदल; 'या' दिग्गजाचा समावेश

पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहा फोजदर गिरी, पोह यशवंत झेमसे, राजेश पाटील, प्रतीक सावंत, जितेंद्र चव्हाण, शामराव कराडे, देवराम कोरम, पोना राकेश म्हात्रे,पोशी अक्षय जगताप,सायबर सेलचे पोना अक्षय पाटील, तुषार घरत, सिद्धेश शिंदे त्याचरोबर या कारवाईत मपोह संजीवनी म्हात्रे, जयश्री पळसकर, मोनिका मोरे, या महिला कर्मचाऱ्यांनाही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com