चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल ! CCTV मध्ये दिसू नये म्हणून छत्रीचा वापर

जवळपास 50 हजारांचा किराणामाल चोरट्यांनी चोरला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल ! CCTV मध्ये दिसू नये म्हणून छत्रीचा वापर
चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल ! CCTV मध्ये दिसू नये म्हणून छत्रीचा वापरविनोद जिरे

बीड: जिल्ह्यात (Beed District) दिवसेंदिवस चोरीच्या घटना समोर येत असताना, ग्रामीण भागामध्ये आता चोरट्यांकडून, अनोखी शक्कल लढवत, चोरी केली जात असल्याचा घटना समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या दिंद्रुडमध्ये समोर आला आहे. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवत, चक्क सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून, छत्रीचा वापर करत दुकाने फोडून चोरी केली आहे.

दिंद्रुड येथील व्यापारी गणेश मायकर यांच्या भर रस्त्यावरील किराणा दुकानांचे गोडाऊन फोडून, तेलाचे बॉक्स, गोडतेल डबे, बिस्किट बॉक्स, असा जवळपास 50 हजारांचा किराणामाल चोरट्यांनी चोरला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर ही चोरी करतांना आपला चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये. यासाठी चोरट्यांनी छत्रीचा वापर केला आहे.

तर दुसऱ्या घटनेत दिंद्रुडमधील देवदहिफळ रस्त्यावर असलेले, अविनाश पांचाळ या व्यापाऱ्याचे पत्र्याचे शेड फोडून, आत प्रवेश करत, एक एलईडी टीव्ही व तिजोरीतील रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दरम्यान या प्रकरणी दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तर गेल्या काही दिवसात दिंद्रुड व दिंद्रुड परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून दिंद्रुड पोलिसांसमोर चोरीच्या घटना रोखनं आव्हान ठरत आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com