Akola: आठ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या

या चोरट्यांनी अकोल्यातील सिव्हील लाईन हद्दीत चार घरफोडया केल्याची कबुली दिली.
Akola: आठ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या
Akola: आठ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्याSaam TV

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात आठ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अकोल्यात पेट्रोलींग करीत असतांना अकोला येथे काही इसम हे संशईत रित्या फिरतांना दिसले त्यांना हटकले असता ते पळुन गेले दरम्यान पोलिसांनी पळून गेलेल्या संशयितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. जानु मनोज सोळंके वय-३२ वर्ष, राजू अदमास पवार आणि राम अदमास पवार वय-२४ तिघेही राहणार रा- जुना बसस्टण्ड जवळ अंजनगाव सुर्जी जि.अमरावती तर मिथुन पिराजी पवार वय-२७ वर्ष रा-घाटबोरी ता. मेहकर जि.बुलढाणा असे या आरोपींची नावे आहेत. या चोरट्यांनी अकोल्यातील सिव्हील लाईन हद्दीत चार घरफोडया केल्याची कबुली दिली.

Akola: आठ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या
'स्वातंत्र्याचे विधान जर मुस्लिमाने केले असते तर त्याचा Encounter केला असता'

तसेच नामे मिथुन पिराजी पवार वय-२७ वर्ष रा-घाटबोरी ता.मेहकर जि.बुलढाणा याने त्याचा भाऊ राजु पिराजी पवार याचे सह पो.स्टे बाळापुर हद्दीतील दोन घरफोडया तसेच पो.स्टे चान्नी हद्दीतील १ घरफोडी व पो.स्टे बार्शीटाकळी जि.अकोला हद्दीतील १ घरफोडी असे एकुण ४ घरफोडया केल्याची कबुली दिली. अशा या आरोपींनी अकोला जिल्ह्यात एकुण ८ घरफोड्या केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी यांनी सदर घरफोडी मधील सोन्याच्या दागदागिन्यांसह लाखोंचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष महल्ले स्थानिक गुन्हे शाखा अकोला स.पो.नि महेश गावंडे, पो.उप.नि सागर हटवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com