Nagpur News: तरुणाला चोरट्यांनी २० लाखाला लुटलं; पैशांची बॅग केली लंपास

रोहीत ट्रेडर्सच्या मालकाकडून २० लाख रुपये घेऊन सिद्धार्थ लकडगंजकडे जात होता.
Crime News Nagpur
Crime News NagpurSaam TV

नागपूर : नागपूरात (Nagpur) मिरची व्यापाऱ्याकडून ट्रान्सपोर्ट मालकाला देण्यासाठी वीस लाख रुपये बॅगमध्ये घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्याकडून तिघांनी भरदुपारी बॅग पळवून नेल्याची घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत (Yashodharanagar Police Station) चिखली उड्डाणपुल परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ रामटेके हे मोहन साजवानी नावाच्या जरिपटका भागात राहणाच्या मिरची व्यावसायिकाकडे काम करतात. त्याचे लकडगंज येथे कार्यालय आहे. बुधवारी रोहीत ट्रेडर्सच्या मालकाकडून २० लाख रुपये घेऊन सिद्धार्थ लकडगंज येथे असलेल्या मालकाच्या कार्यालयाकडे जाण्यास कळमना येथून आपल्या दूचाकीने लकडगंजच्या दिशेने निघाले.

Crime News Nagpur
बदलापुरात चोरट्यांचा धुमाकुळ चोरी करुन वॉचमनला मारले दगडं; घटना कॅमेरात कैद

दरम्यान, ते चिखली उड्डाणपुलावर येताच, मागून तीन युवक त्यांच्या बरोबरीने आले. त्यांनी त्याला अडवून धक्काबुक्की करीत, बॅग हिसकावून पसार झाले. यावेळी सिद्धार्थने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. दरम्यान याबाबत त्याने मालक मोहन यांना सांगितले. त्यांनी यशोधरानगर पोलिस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. त्या आधारावर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धार्थच्या हातातून २० लाख रुपयाची बॅग हिसकावून नेल्यावर त्याने ही माहिती मालकाला न देता, थेट घर गाठले. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी तो भेदरलेल्या अवस्थेत असल्याने त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने ही बाब सांगितली.

पाहा व्हिडीओ -

त्यावरुन घरच्यांनी त्यांची समजूत काढून मालकाला माहिती देण्यास सांगितले. दरम्यान सांयकाळी ही माहिती मालकाला दिली असता, त्यांनी कळमना पोलिस ठाणे गाठले. मात्र, घटना दुसऱ्या हद्दीत घडल्याने त्यांनी यशोधरानगर पोलिसांना याबाबत तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com