सांगली जिल्ह्यात कुपवाड येथे तिसऱ्या मियावाकी जंगल प्रकल्पाला प्रारंभ
सांगली जिल्ह्यात कुपवाड येथे तिसऱ्या मियावाकी जंगल प्रकल्पाला प्रारंभविजय पाटील

सांगली जिल्ह्यात कुपवाड येथे तिसऱ्या मियावाकी जंगल प्रकल्पाला प्रारंभ

सांगली जिल्ह्यात कुपवाड येथे तिसऱ्या मियावाकी जंगल प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कुपवाड येथील एमआयडीसीच्या भूखंडावर हा प्रकल्प साकार होत आहे.

सांगली जिल्ह्यात कुपवाड येथे तिसऱ्या मियावाकी जंगल प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कुपवाड येथील एमआयडीसीच्या भूखंडावर हा प्रकल्प साकार होत आहे. तीन हजार चौरस फूट जागेवर 850 झाडे लावण्यात आली आहेत. फाईन ग्रुपचे राहुल देशपांडे, यशवंत तोरो, डॉ. रवींद्र होरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकल्प सुरू करण्यात आला. सुरज फाऊंडेशनचे सचिव एन. जी. कामत आणि प्रकल्प सल्लागार डॉ. हर्षद दिवेकर यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. third Miyawaki Forest Project started at Kupwad in Sangli District

हे देखील पहा -

वृक्षतोडीमुळे जगभर 50 टक्के जंगल नष्ट झाले आहे. तेव्हा कमी जागेत जास्त झाडे लावण्याचा प्रयोग हाती घ्यावा लागेल, असे निसर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र होरा यांनी नमूद केले. अशा प्रकारचे तीन जंगल प्रकल्प सांगली जिल्ह्यात सुरू झाले आहेत. या प्रकल्पाच्या जागेवर झाडे लावण्यासाठी सुरज फाऊंडेशनचे प्रमुख प्रवीण लुंकड यांनी कोकणातुन विविध प्रकारची झाडे आणली.

सांगली जिल्ह्यात कुपवाड येथे तिसऱ्या मियावाकी जंगल प्रकल्पाला प्रारंभ
शिक्षक पात्रता परीक्षा आयोजनाला मान्यता

या अगोदर मिरज तालुक्यातील तुंग, नांगोळे आणि कवठेमहांकाळ येथे अशा प्रकारचे जंगल प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. कुपवाड येथे होणारा हा जिल्ह्यातील तीसरा प्रकल्प आहे. मियावाकी प्रकल्पात जमिनीची आठ फूट खुदाई केली जाते. या ठिकाणी ठराविक अंतरावर वृक्ष लागवड केल्यानंतर ठिबक पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. एका वर्षात या झाडांची उंची पंधरा फूट इतकी होते.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com