तेरा वर्षांची मुलगी प्रेग्नंट; गर्भपात करत महिला डॉक्टरची मुलाला साथ

अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत त्यांच्या सह या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे.
तेरा वर्षांची मुलगी प्रेग्नंट; गर्भपात करत महिला डॉक्टरची मुलाला साथ
तेरा वर्षांची मुलगी प्रेग्नंट; गर्भपात करत महिला डॉक्टरची मुलाला साथSaam tv

वर्धा: आर्वी शहरात अल्पवयीन १३ वर्षीय मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रीतसर परवानगी घेऊन  कदम हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरला रेखा कदम यांना पोलिसांनी अटक केल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच  खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टर तसेच अल्पवयीन मुलगा तसेच दोन अन्य आरोपी असे एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली केली असून डॉक्टर सहा दोन आरोपींना दोन दिवसाचा पोलीस रिमांड देण्यात आला तर अल्पवयीन मुलाला रिमांड होममध्ये पाठविण्यात आले आहे अशी माहिती तपासी अधिकारी जोस्तना गिरी यांनी दिली आहे

तेरा वर्षांची मुलगी प्रेग्नंट; गर्भपात करत महिला डॉक्टरची मुलाला साथ
पंजाबमधील 15 दहशतवादी संघटनांसह 'ही' 24 कारणं बनली पंतप्रधानांसाठी धोका!

अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत त्यांच्या सह  या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी सह एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत सोबत सूत जुळले. मुलगा साडे सतरा वर्षाचा, तर मुलगी तेरा वर्षांची आहे. यातच मुलीला गर्भधारणा झालीय. यासंबंधात पीडित मुलीच्या आईवडिलांनी अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या पालकांशी संपर्क साधला याद मुलीची बदनामी होणार असे धमकावून तिचा गर्भपात करून घेण्याचा अट्टाहास करण्यात आला तदनंतर डॉक्टरला तीस हजार रुपयात देवून गर्भपात करण्यात आला.असे तक्रारीत नमूद आहे.

याबाबत शनिवारीला रात्री आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली यावरून पोलिसांनी रात्रीच रीतसर परवानगी घेऊन लगेचच कार्यवाही करण्याच्या हालचाली केल्या. मात्र रात्री घर आणि दवाखाना बंद असल्याने पोलिसांनी रात्रभर पाळत ठेवावी लागली आणि सकाळी महिला डॉक्टरला सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुले आणि पथकाने अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले 

या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत व बेकायदेशीर, गर्भपात इतर परवानगी न घेता अल्पवयीन मुलीचा गर्भपात आदी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके ठाणेदार भानुदास पिदुरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पॉस्को सेलच्या उपनिरीक्षक जोशना गिरी या घटनेचा तपास करीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com