
अमरावती : जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. कारंजा बहीरम येथील पंचशील आदिवासी आश्रम शाळेत ३० विद्यार्थ्यांना विषबाधा (Students Poisoned) झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांच्या पोटात अचानक मळमळ होऊ लागल्याने डोकेदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणं त्यांच्यामध्ये जाणवू लागली. या घटनेबाबत पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अचलपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. (Thirty Students poisoned in panchshil adivasi aashram school)
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार बाजार तालुक्यात कारंजा बहीरम येथील पंचशील आदिवासी आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी या घटनेची तातडीनं दखल घेवून बाधा झालेल्या विद्यार्थ्यांना अचलपूर जिल्हा रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले.
सदर विद्यार्थ्यांवर उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. विद्यार्थांना विषबाधा कशामुळं झाली, याबाबत नेमकं कारण कळू शकलं नाही.पिण्याच्या पाण्यातून किंवा जेवणातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.