नाशिक: अशी होतेय ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी...

हे साहित्य संमेलन केवळ साहित्य संमेलन न राहता तो नाशिकचा उत्सव व्हावा, यासाठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
नाशिक: अशी होतेय ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी...
नाशिक: अशी होतेय ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी...Saam Tv

नाशिक: नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला आता वेग आलाय. येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबरला नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. हे साहित्य संमेलन केवळ साहित्य संमेलन न राहता तो नाशिकचा उत्सव व्हावा, यासाठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

हे साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रशस्त मैदानावर होणार असून एका वेळी ८ ते १० हजार साहित्य प्रेमी बसू शकतील इतका भव्य आणि प्रशस्त सभामंडप उभारण्यात येणार आहे. संमेलनस्थळी बालकवी संमेलन, कवी कट्टा, गझल आणि भव्य पुस्तक प्रदर्शन अशी वेगवेगळी व्यवस्था भुजबळ नॉलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये असणार आहे. तर साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहराचं सुशोभीकरण, चौकाचौकात तसंच गंगाघाटावर आकर्षक सजावट, रांगोळ्या, लाईटिंग, संमेलनाचे होर्डिंग्ज लावण्याचं नियोजन करण्यात येतंय.

नाशिक: अशी होतेय ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी...
देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय! ; सौरभ कृपाल बनले पहिले 'समलैंगिक जज'

विशेष म्हणजे साहित्य संमेलन दर्जेदार व्हावं, जास्तीत जास्त साहित्य प्रेमी आणि नागरिकांना साहित्य संमेलनात सहभागी होता यावं, यासाठी नाशिक शहरातील १४ ठिकाणांहून संमेलन स्थळी येण्या-जाण्यासाठी दर १५ मिनिटाला महापालिकेची शटल बससेवा ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संमेलन स्थळी येणाऱ्या साहित्य रसिकांना मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.