'खट्या’गाईंचे संगोपन करणारी जोडमोहा एकमेव गोशाळा

श्री खटेश्‍वर संस्थान जोडमोहा येथे अंध, म्हातारे तब्बल 175 पेक्षा जास्त देशी गाईंचे संगोपन करीत आहे.
'खट्या’गाईंचे संगोपन करणारी जोडमोहा एकमेव गोशाळा
'खट्या’गाईंचे संगोपन करणारी जोडमोहा एकमेव गोशाळासंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ - दुधाळ गाई Cow तसेच उत्पन्न देणार्‍या जनावरांचे संगोपन Care अनेक जण करतात. जनावर म्हातारे झाले, अपंगत्व Disability आले तर अशा जणावरांची फारसी काळजी घेतली जात नाही. याउलट श्री खटेश्‍वर संस्थान जोडमोहा येथे अंध Blind, म्हातारे Old तब्बल 175 पेक्षा जास्त देशी गाईंचे संगोपन करीत आहे. This is the only cowshed to raise Disability cows

अशा पद्धतीने सेवा करणारी राज्यातील ही एकमेव संस्था आहे. पंचक्रोषीत घरादारांवर दुध,दही,ताक,लोणी,तुप अशा पंच पदार्थांचा अभिषेक घालणाऱ्या मुक्या जिवांना वार्धक्य मध्ये वाऱ्यावर सोडलेल्या मुक्या जीवांना मायेच्या ममतेने कुखाळून तमाम जिवांची काळजी घेणारे यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील जोडमोहा येथील अवलीया श्री. खटेश्वर महाराज यांनी सन १९०७ साली प्रारंभ केला आहे.

हे देखील पहा -

प्राणीमात्राप्रती सेवाभाव जागृत करणारे विचार ज्वालाप्रसाद यांनी जोडमोहा परिसरातून रूजवायला सुरूवात केली. ते जेथे-जेथे जायचे तेथे खाटेवर बसून ते प्रबोधन करायचे. लुळे, पांगळे व्याधीग्रस्त अशा ‘खट्या‘जनावरांची सेवा करायचे. म्हणून खटेश्वर महाराज या नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यांनी साधारणत: 1907 मध्ये सुरू केलेली गोसेवा आजही जोडमोहा येथे सुरू आहे. 

अंध, म्हातारे, भाकड तसेच खट्या झालेल्या गाई अनेक जण विकायचे. काहीजण ते मोकाट सोडून द्यायचे. मात्र, अशा देशी गाईंचे संगापन करण्याची सुरूवात खटेश्‍वर महाराज यांनी केली. तेव्हापासून या ठिकाणी असलेल्या गोशाळेत गाईंचे संगोपन केले जाते. आजही खटेश्वर हे देवस्थान महाराजांच्या तत्त्वावर चालत आहे. इथे धार्मिक कार्यक्रमांपेक्षा सेवाभावी कार्याला अधिक महत्त्व आहे. दिव्यांग, जखमी, व्याधीग्रस्त गोवंश, कुत्री, कावळे, चिमण्या व पक्षी यांची सेवा केली जाते. 

'खट्या’गाईंचे संगोपन करणारी जोडमोहा एकमेव गोशाळा
मला चिकन हवं आहे... डिसचार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णाचा अनोखा हट्ट

सध्या गोशाळेत 170 पेक्षा जास्त देशी गाई आहेत. त्यांची सेवा संस्थानतर्फे केली जाते. विशेष म्हणजे, या ठिकाणी गाईचे दूध हे पिलांसाठी आहे. जी जनावरे कत्तलखान्यात जायची ती देवस्थानात आणून त्यांची निगा राखली जाते. ‘खट्या’देशी गाईचे संगोपन करणारी एकमेवच संस्था आहे. या ठिकाणी देशी गाईंची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना लागणार्‍या चारापाण्याची व्यवस्था संस्थांनतर्फे केली जाते.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com