
औरंगाबाद - गेल्या १२१ वर्षांमध्ये यंदाचा मार्च सर्वांत उष्ण ठरला आहे. आता एप्रिल महिनाही त्यापेक्षा अधिक उष्ण असणार आहे. कारण मागील वर्षातील सरासरी ३३.०९ अंशांचा उष्णतेचा विक्रम यंदाच्या उष्णतेने मोडला आहे.
यंदाच्या मार्च महिन्यातील उष्णतेने १२१ वर्षातील सर्वाधिक तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. मार्च १९०१ पासून आजतागायत १२१ वर्षातील मार्च २०२२ हा महिना भारतातील सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यातील मासिक सरासरी ३३.१० अंश सेल्सिअस आहे. २०२१ यावर्षामधील मार्च महिन्यात हीच सरासरी ३३.०९ अंश सेल्सिअस होती. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीतून हे समोर आलं आहे.
हे देखील पहा -
दीर्घकाळापर्यंत दुष्काळी स्थितीमुळे वायव्य भारतात उष्णता वाढली आहे. ३१ मार्च रोजी दिल्लीच्या काही भागांमध्ये उन्हाचा तीव्र फटका बसला होता. या तीनही ठिकाणांचे कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले. आता ३ एप्रिलपासून ते ६ एप्रिलपर्यंत देशभरात विविध ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
ही उष्णतेची लाट मुंबईसह संपूर्ण कोकण, आणि महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागात असणार आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, बुलढाणा, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आदी जिल्ह्यांत तापमानाचा पारा एप्रिलमध्येही चढा राहण्याची शक्यता आहे.
सामान्यतः उन्हाळ्यात मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, तेलंगणा, ओडिशा आदी भागांत उष्णतेच्या तीव्र लाटा येत असतात. मात्र यंदा या लाटा बहुतांश ठिकाणी तीव्र झालेल्या आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात शंभर वर्षापेक्षा जास्त काळातलं सर्वाधिक तापमान दिसून आलं. आता एप्रिल आणि मे हे दोन महिने त्यापेक्षाही हॉट असतील, त्यामुळे आतापासूनच काळजी घ्यायला सुरू करा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.