बुलढाण्यात लोकांना कोरोनाचा विसर, सैलानी दर्गा परिसरात जमली हजारोंची गर्दी

सैलानी येथे जिल्हाधिकाऱ्यांचा गर्दी न करण्याचे आदेश दिले असतानाही आज मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे.
बुलढाण्यात लोकांना कोरोनाचा विसर, सैलानी दर्गा परिसरात जमली हजारोंची गर्दी
बुलढाण्यात लोकांना कोरोनाचा विसर, सैलानी दर्गा परिसरात जमली हजारोंची गर्दीसंजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सैलानी दर्गा बाबा परिसरामध्ये हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी जमा झाली आहे कोरोनाचा संसर्ग अजुनही पुर्णपणे संपला नसतानाही इथे जमलेल्या नागरिकांच्या तोंडाला मास्कही नाहीत आणि सोशल डिस्टनगसिंग चा तर पुर्णपणे फज्ज़ा उडाल्याचे दिसून आले आहे. Thousands of people have gathered in the Dargah Baba area

हे देखील पहा-

रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सैलानी येथे जिल्हाधिकाऱ्यांचा गर्दी न करण्याचे आदेश दिले असतानाही आज मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला नागरिकांनी केराची टोपली दाखवली आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोळ्याच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये असे आदेश दिल्यानंतर ही एवढी मोठी गर्दी झालीच कशी प्रशासनाचा यावर काही वचक राहिला नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

बुलढाण्यात लोकांना कोरोनाचा विसर, सैलानी दर्गा परिसरात जमली हजारोंची गर्दी
आव्हाड आता तुम्हीही बॅग भरा - किरीट सोमय्यांचा निशाणा

एकंदरीत या सैलानी मध्ये राज्यासह परराज्यातील नागरिक दर्शनासाठी येत असतात मात्र आदेश असूनही या आदेशांना केराची टोपली दाखवली जाते आणि खुद्द प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळेच ही गर्दी झाली असल्याच चित्र पहायला मिळत आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com