Beed News : माझ्याशी बोल नाहीतर संसार मोडेल, धमकी देत ऊसतोड कामगार महिलेवर अत्याचार

बीडमध्येही एका ऊसतोड कामगार महिलेवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 Minor Girl molested
Minor Girl molestedsaam tv

Beed News : बीड : भंडाऱ्यात महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर आता बीडमध्येही एका ऊसतोड कामगार (woman molested) महिलेवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात (Beed Police) बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 Minor Girl molested
मदरशात शिक्षकांकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून ५ मुले पळाली, डोंबिवली रेल्वे स्टेशनवर...

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराची घटना उघड झाली असतानाच, बीडमध्येही एका विवाहित महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपी हा पीडितेला तिचा संसार मोडण्याची धमकी देत होता, अशी तक्रार पीडितेने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुझा संसार मोडणार अशी धमकी आरोपी या महिलेला देत होता. पीडित विवाहित महिला २९ वर्षांची आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, ती पतीसोबत ऊस तोडणीला गेली होती. त्या ठिकाणी उसतोडणीला आलेला आरोपी राम याच्यासोबत तिची ओळख झाली होती. ऊसतोडणी करून परत आल्यानंतर राम हा वारंवार तिला फोन करत होता.

 Minor Girl molested
Common Wealth Games 2022 : मराठमाेळ्या अविनाश साबळेनं पटकाविलं राैप्यपदक (व्हिडिओ पाहा)

तिला सतत त्रास देत होता. त्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यावर तू माझ्याशी बोलली नाहीस तर, तुझा संसार मोडेन, अशी धमकी तो देत होता. तसेच पीडितेला बळजबरीने लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी रामविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com