व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत; तरुणीला मागितली तीन लाखांची खंडणी

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत; तरुणीला मागितली तीन लाखांची खंडणी
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत; तरुणीला मागितली तीन लाखांची खंडणीSaam Tv

नागपुरात एका अल्पवयीन तरुणीला आंघोळ करतानाचा व्हिडीओ दाखवून अपहरण केल्यानंतर निर्जनस्थळी  तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.  एवढंच नाही तर आंघोळीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी तिच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. असं तरुणीने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

ही घटना नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यानची आहे. या पैकी मुख्य आरोपी हा पीडित फिर्यादी तरुणीच्या नातेसबंधातील आहे. सलग सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ आरोपी हे फिर्यादी पीडित तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. आरोपींच्या रोजच्या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बुधवारी रात्री मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, ज्याच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत; तरुणीला मागितली तीन लाखांची खंडणी
रोहा ते वीर रेल्वेमार्ग झाला दुपदरी; मुंबई ते वीर लोकल सुरू होणार?

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मंगेश घोडके आणि निलेशसिंग ठाकूर आणि आकाश नावाच्या या तिघांचा समावेश आहे. आरोपींनी तरुणीचे अपहरण केल्यानंतर तिला निर्जनस्थळी घेऊन गेले. तिच्यावर अत्याचार  केल्यानंतर आरोपींनी तिच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ वायरल करण्याची धमकी आरोपींनी तिला दिली होती. नात्यातील लोकांनीच हा सगळा प्रकार केला असल्याने विश्वास ठेवायचा तरी कोणावर हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com