सेना मंत्र्यास जीवे मारण्याची धमकी नव्हे; त्यांचीच स्टंटबाजी

जनतेला न्याय देण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेSaamTV

चंद्रपूर : गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना माओवादी संघटनेने कोणतीही धमकी दिलेली नाही. तो त्यांनीच रचलेला स्टंट आहे असे पत्रत माओवाद्यानी काढले आहे.महाविकास आघाडीचे मंत्री आणि गडचिराेली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी माआेवाद्यानी दिल्याची चर्चा हाेती. या चर्चेवर माओवादी संघटनेने पत्रक काढून संवग प्रसिद्धीसाठी मंत्री शिंदे यांचा हा स्टंट असू शकताे असे म्हटले आहे. shivsena eknath shinde maoist chandrapur gadchiroli news

सवंग लाेकप्रियतेसाठी तसेच समाजात स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी असे प्रकार पुढा-यांकडून केले जातात. पंतप्रधान देखील यातून सुटलेले नाहीत. त्यांनीही एनआयएच्या NIA माध्यमातून स्वतःच्या हत्येचा कट रचत लोकप्रियता मिळवली. राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिराेलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील तेच करीत आहेत असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे
नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : प्रवीण दरेकर

भाकपचा (माओवादी) पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याच्या नावाने हे पत्रक समाज माध्यमातून व्हायरल झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड प्रकल्पाला नागरिकांचा होत असलेला विरोध दडपण्यासाठी एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार पोलिस बळाचा वापर करीत आहेत.

दरम्यान हे पत्र अधिकृत आहे किंवा अनधिकृत हे तूर्तास सांगता येणार नाही. हे पत्र आपल्याला समाज माध्यमातून मिळाले आहे. त्याची चाैकशी सुरु आहे अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com