Mahableshwar : महाबळेश्वरात 'एसबीआय' चं एटीएम फाेडण्याचा प्रयत्न फसला; तिघे ताब्यात

संबंधित युवक हे स्थानिक हाॅटेलात काम करणारे आहेत असेही पाेलिसांनी नमूद केले.
Satara, arrest , mahableshwar , atm center
Satara, arrest , mahableshwar , atm centerSaam Tv

Mahableshwar : सातारा जिल्ह्यात एटीएम फोडीच्या एकामागोमाग घडणाऱ्या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. या आधी कराड (karad) आणि नागठाणे येथील एटीएम मशीन जिलेटीनने उडवून चोरी करण्यात आली होती. त्यानंतर महाबळेश्वर (mahableshwar) येथील मुख्य बाजारपेठे लगत असणाऱ्या स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला पण ताे फसला. दरम्यान या प्रकरणी पाेलिसांना तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Mahableshwar Latest Marathi News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार चोरट्याने एटीएममध्ये प्रवेश करून ते फाेडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न असफल झाल्याने संबंधित चोरटा त्या ठिकाणाहून फरार झाला. आम्ही एटीएम केंद्राची पाहणी केली. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तपास सुरु केला आहे. त्यात तिघे असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी शहाबुद्दीन फैरन बागवान , अंकित कुमार शिवनरेश कुमार पाल तसेच एका अल्पवयीन मुलास अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. संबंधित युवक हे स्थानिक हाॅटेलात काम करणारे आहेत असेही पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Satara, arrest , mahableshwar , atm center
Shivendraraje Bhosale : उदयनराजे पुर्वी कुचकं बाेलायचे आता ते..., शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com