व्हेल माशाची उलटी तिघांना पडली भारी; तीन जण अटकेत, 5 कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त!

व्हेल माशाची उलटी ही समुद्रातील तरंगते सोने म्हणून ओळखली जाते. मात्र, हीच उलटी विकणे कायद्याने गुन्हा आहे.
व्हेल माशाची उलटी तिघांना पडली भारी; तीन जण अटकेत, 5 कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त!
व्हेल माशाची उलटी तिघांना पडली भारी; तीन जण अटकेत, 5 कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त! SaamTvNews

-- राजेश भोस्तेकर

रायगड : व्हेल माशाची उलटी ही समुद्रातील तरंगते सोने म्हणून ओळखली जाते. मात्र, हीच उलटी विकणे कायद्याने गुन्हा आहे. असे असूनही मुरुड मधील तीन जणांनी विक्रीकरिता बेकायदेशीररीत्या बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे पथकाने तिघांना 10 जानेवारी रोजी रात्री काशीद (Kashid) येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 किलो वजनाची उलटी, दोन मोटार सायकल असा 5 कोटी 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे देखील पहा :

तीनही आरोपी विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगडात आतापर्यत दोन गुन्हे व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीबाबत घडले आहेत. याआधी अलिबागमधील तिघांना अटक केली होती.

शासनाने (Government) बंदी घातलेल्या व्हेल माशाची उलटी 10 जानेवारी रोजी विक्रीसाठी काशीद येथे एका हॉटेलात घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस नाईक अक्षय जाधव यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्था. गु.अ. शाखा, रायगड (Raigad) यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. त्यानुसार काशीद येथे स्थानिक गुन्हे पथकाने सापळा रचला होता.

व्हेल माशाची उलटी तिघांना पडली भारी; तीन जण अटकेत, 5 कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त!
अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा!

मुरूड (Murud) तालुक्यातील मौजे काशिद गावचे अलिबाग (Alibag) मुरूड रोडवरील सद्गुरू कृपा गेस्ट हाउस समोर पथकाने छापा टाकला असता दर्पण रमेश गुंड, वय 38 वर्षे, रा. मजगाव, ता. मुरूड, जि.रायगड, नंदकुमार खंडु थोरवे वय 41 वर्षे, रा. नांदगाव, ता. मुरूड, जि. रायगड आणि राजेंद्र जनार्दन ठाकुर, वय 50 वर्षे, रा. मजगाव, ता. मुरूड, जि. रायगड यांना ताब्यात घेतले. तिघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्याकडे 5 किलो ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी (Whale Vomit), तपकिरी रंगाचे साधारण ओलसर व सुंगधीत पदार्थ व दोन मोटार सायकल असा एकुण 5 कोटी 90 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला सापडला.

व्हेल माशाची उलटी तिघांना पडली भारी; तीन जण अटकेत, 5 कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त!
अहो आश्चर्यम! बीडमध्ये म्हशीने दिला आठ पायांच्या रेडकाला जन्म

तीनही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्यांतर्गत मुरूड पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ.शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पवनकुमार ठाकुर, पोह बंधु चिमटे, पोह.हणमंत सुर्यवंशी, पोना अक्षय जाधव, पो.कॉ. ईश्वर लांबोटे यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com