सातारा काेर्टाच्या बाहेर तीन कार एकमेकांना धडकल्या; पाेलिस घटनास्थळी दाखल

या अपघातामुळे काही काळ परिसरातील वाहतुक खाेळंबली हाेती.
satara, court , police, accident, cars
satara, court , police, accident, carssaam tv

सातारा : सातारा (Satara) जिल्हा न्यायालयाच्या (Court) समोर आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास तीन कार एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे या वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात (accident) काेणालाही इजा झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. (Satara Accident News)

पाेवई नाका ते सातारा जिल्हा न्यायालय हा रस्ता तीव्र उता-याचा आहे. त्यामुळे या परिसरात वेगाने वाहनं धावत असतात. काही वेळेला या परिसरात छाेटे माेठे अपघात हाेत असतात. आजही या परिसरात अपघात झाला.

satara, court , police, accident, cars
Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धा खेळणार नाही ! नीरज चाेप्रानं केलं जाहीर; जाणून घ्या कारण

या रस्त्यावरुन चाललेल्या तीन चार चाकी एकमेंकावर आदळल्या. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पाेलिस दाखल झाले हाेते. त्यांनी तिन्ही वाहनांचे छायाचित्र त्यांच्या माेबाईलमध्ये काढले. या अपघातामुळे काही काळ परिसरातील वाहतुक खाेळंबली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

satara, court , police, accident, cars
Maharashtra Politics : 'वेळ आली की ठाण्याची दाढी कार्यक्रम करते' (व्हिडिओ पाहा)
satara, court , police, accident, cars
विटा पोलिसांची दमदार कामगिरी, ५ घरफोड्या उघडकीस; सातारा, सांगलीतील युवक अटकेत
satara, court , police, accident, cars
Satara Breaking News : पाणी भरू न दिल्याने दाेन कुटुंबात राडा; तलवार, कुऱ्हाडीनं एकमेकांवर हल्ला

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com