Nashik: नाशिक आणि दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के; एका तासात 3 वेळा भूकंप

नागरिकांनी घाबरून न जाण्याचं प्रशासनाकडून आवाहन
Earthquake in Nashik
Earthquake in Nashiksaam TV

नाशिक - शहर व तालुक्यात अनेक गावांना मंगळवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान भूकंपाचे (Earthquake)सौम्य धक्के जाणवले. तीन वेळा जाणवले भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये (Nashik) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकच्या वेधशाळेपासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे.

हे देखील पाहा -

मेरीच्या भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्री 08.58 वाजता त्यानंतर 09.34 वाजता आणि 09.42 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 3.4, 2.1 आणि 1.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती समोर आली आहे. दिंडोरी शहर, मडकीजांब, हातनोरे, निळवंडी, जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव, वनारवाडी, पाडे या परिसरात रात्री 8.58 ते 9.45 दरम्यान भूकंपाचे तीन धक्के जाणवले.

भूकंपाच्या या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नसले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.

Earthquake in Nashik
Crime: चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक; सोन्याच्या दागिनेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

याबाबत प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर तहसीलदार पंकज पवार यांनी मेरी केंद्र तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभागास याबाबत माहिती दिली आहे. मेरी केंद्राकडून सदर घटनेला दुजोरा मिळत 3.4 रिश्टर स्केलचे रात्री 9.58 मिनिटांनी पहिला धक्का बसल्याची नोंद झाली आहे.

केंद्रबिंदू नाशिकपासून 16 ते 20 किमी असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये,मात्र काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com