Mumbai Goa Highway Accident News : मुंबई गाेवा महामार्गावर भीषण अपघात, कारचा चक्काचूर; तिघे जखमी

या अपघातानंतर स्थानिक रहिवाशी घटनास्थळी मदतीसाठी पाेहचले.
accident, mumbai goa highway, injured, kokan news
accident, mumbai goa highway, injured, kokan news saam tv

- जितेश काेळी

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई-गोवा मार्गावरील भरणे येथील काशीमठा समोर आज (शुक्रवारी) कार आणि टेम्पाेचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत.

मुंबईहून साखरपाच्या दिशेने कार निघाली हाेती. त्यावेळी कारची आणि टेम्पोची धडक झाली. हा अपघात इतका भीषण हाेता की कारचा चक्काचूर झाला. हा अपघात (accident) घडल्यानंतर माेठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. (Maharashtra News)

accident, mumbai goa highway, injured, kokan news
Kokan News : जे 'मविआ' ला जमलं नाही ते शिंदे-फडणवीस सरकारनं केलं, काेकणातील आमदाराच्या पाठपूराव्याला यश

यावेळी स्थानिकांनी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात (hospital) उपचारासाठी पाठविले. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार अनंत सखाराम गवळी, सुरेश सखाराम महाडिक व लक्ष्मण सखाराम महाडिक हे तिघेजण जखमी (injured) झाले.

Edited By : Siddharth Latkar

accident, mumbai goa highway, injured, kokan news
Satara News : 'कोयनेच्या सुपुत्राला वेळ नाही ही निष्क्रियपणाची बाब'; पाटणकरांचा मुख्यमंत्र्यांवर राेष
accident, mumbai goa highway, injured, kokan news
Veer Sawarkar Row : भाजप खासदार म्हणतात, 'घराेघरी जाऊन सांगा राहुल गांधींचा डीएनए तपासला पाहिजे' (पाहा व्हिडीओ)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com