Akola Accident News : वणी रंभापुरजवळ अपघात, कारचा चूराडा; मदत करणा-यांची मने हेलावली

Vidarbha News: यावेळी घटनास्थळी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावरील नागरिकांनी धाव घेतली.
akola accident news
akola accident newssaam tv

Akola News : अकोला राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वणी रंभापुर नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा चुराडा झाला आहे. तर या कारमधील तीन प्रवासी गंभीर जखमी (injured) झाले आहेत. हा भीषण अपघात (accident) आज (गुरुवार) दुपारी घडली. (Akola Latest Marathi News)

akola accident news
Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार अकोलाहून मुर्तिजापूरच्या दिशेने जाणा-या कारचा वणी रंभापुर ते पैलपाडा कॅनाल नजीक अपघात झाला. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. यावेळी घटनास्थळी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावरील नागरिकांनी धाव घेतली. (Breaking Marathi News)

akola accident news
Shamika Chipkar Sets World Record : लाटांशी टक्कर देत बारा वर्षीय शमिकाने अरबी समुद्रात नाेंदविला विश्वविक्रम

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी माॅ चंडिका माता आपत्कालीन व्यवस्थापन पथक, वन्दे मातरम् आपत्कालीन व्यवस्थापन पथक कुरणखेड यांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी मिळून कारममध्ये अडकलेल्या तिघांना शर्थीचे प्रयत्न करुन काढले. या जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चालक जानसन वाघमारे, अनिल सुखदेव चराटे आणि लता सुखदेव चराटे हे तिघे जखमी झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com