पुणे बंगळूर महामार्गावरील अपघातात साता-याचे तिघे जखमी

पुणे बंगळूर महामार्गावरील अपघातात साता-याचे तिघे जखमी
pune bangloare national highway

क-हाड (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर pune bangloare national highway गोटे (ता.कराड) गावच्या हद्दीत आज बुधवार) एका चारचाकी ट्रॅक्टरवर आदळली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक कांही काळ विस्कळीत झाली होती. या अपघातात साता-यातील मंगळवार पेठेत राहणा-या एका कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत. (three-injured-pune-bangloare-national-highway-satara-marathi-news)

दरम्यान अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. जखमींना रूग्णालयात पाठवल्यानंतर महामार्ग देखभालचे व महामार्ग पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केला.

आज (बुधवार) सकाळी साडे दहाच्या सुमारास ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ११ यु ०८२३ हा ट्रॉली क्रमांक एम. एच. ११ आर ९६५३ व ९६५४ घेऊन क-हाडच्या दिशेने जात हाेते. गोटे गावानजीक साता-याहून कोल्हापूर दिशेने चालेल्या चार चाकी (एम. एच. १२ ईटी ३४३७) चालविणा-याचा ताबा सुटल्याने ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात चालकासह कारमधील बारटक्के कुटुंबातील तिघे जखमी झाले.

pune bangloare national highway
मराठा युवकांसाठी समरजीतराजे घाटगेंचा महत्वपुर्ण पुढाकार

या अपघातातील जखमी योगेश अशोक बारटक्के (वय ३५), भारती अशोक बारटक्के (वय ५५) निरज योगेश बारटक्के (वय ५ सर्व रा. मंगळवार पेठ सातारा) यांना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com