खळबळजनक ः एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

खळबळजनक ः एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
चिमुरडीसह आत्महत्या केलेले फाटक कुटुंब.

अहमदनगर ः नगर शहरातील केडगाव या उपनगरात आज सकाळी एकाच कुटुंबातील 3 जण मृतावस्थेत आढळले. या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीचा यात समावेश आहे. वडिलांनी गळफास देवून नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. Three members of the same family commit suicide in Kedgaon

चिमुरडीसह आत्महत्या केलेले फाटक कुटुंब.
यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

आज (सोमवारी) सकाळी ही घटना उघडकीस आली. यात आई-वडिलांसह लहान मुलीचा समावेश आहे. केडगाव देवी रोडवरील अथर्वनगर हा परिसर ठुबे मळा येथे आहे. तेथे फाटक कुटुंबात हा प्रकार घडला आहे. संदीप दिनकर फाटक (वय 40), किरण संदीप फाटक (वय 32) आणि मैथिली संदीप फाटक (वय 10) अशी मयतांची नावे आहेत.

फाटक हे व्यावसायिक होते. परंतु, व्यावसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज वाढले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. सकाळी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्या मृतादेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.Three members of the same family commit suicide in Kedgaon

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com