रायगड जिल्ह्यात तिघांचा बुडून मृत्यू; तर तीन जण गेले वाहून, शोध सुरू

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली असताना तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यात तिघांचा बुडून मृत्यू; तर तीन जण गेले वाहून, शोध सुरू
रायगड जिल्ह्यात तिघांचा बुडून मृत्यू; तर तीन जण गेले वाहून, शोध सुरूSaam Tv news

राजेश भोस्तेकर

रायगड - जिल्ह्यात मुसळधार पावसाने heavy rain in raigad district सगळीकडे पूरस्थिती flood situation निर्माण झाली असताना तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. सुरेश हरेश कोळी (42), राहणार, मेदडी म्हसळ, खाडीत, प्रमोद जगन जोशी (26), कर्जत, देवपाडा पोशिर नदीत तर कळंबोली येथील दीपक गंभीरसिंग ठाकूर (24) ही पाली पोयजे येथे तलावात बुडालेल्याची नावे आहेत. या तिघांचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. three people are drowned and dead in raigad

हे देखील वाचा -

सुरेश कोळी हे काल मेदडी येथील खाडीत आपल्या सहकाऱ्यांसोबत छोट्या बोटीने मासे पकडण्यास गेले होते. यावेळी बोट खाडीत उलटी होऊन दोघेही खाडीच्या पाण्यात कोसळलं. यात सुरेश कोळी हे खाडीच्या पाण्यात बुडाले असून त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही तर दुसरा सहकारी वाचला आहे. कर्जत येथील प्रमोद जोशी हा पोशिर नदीत पोहायला गेला असता बुडाला आहे तर कळंबोली येथील दीपक ठाकूर हा आपल्या दोन मित्रांसह पाली पोयजे येथील तलावात पोहण्यास गेले होते. यावेळी दीपक याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. पाण्यात बुडालेल्या या तिघांचा अद्याप शोध लागलेला नाही. स्थानिक प्रशासनाकडून तिघांचा शोध सुरू आहे.

Edited By - Akshay baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com