हृदयद्रावक! भरधाव वेगानं जाणाऱ्या टॅंकरने वडिलांसह दोन मुलांना चिरडलं

श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे.
Shrirampur accident update
Shrirampur accident updatesaam tv

श्रीरामपूर : श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. येथील गायकवाड वस्तीजवळ असलेल्या (Shrirampur Accident News) श्रीकृष्ण मंदिरासमोर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकरने वडिलांसह दोन मुलांना चिरडल्याची (three people died) दुर्देवी घटना घडली आहे. हा भीषण अपघात आज शनिवारी श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावर सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास झाला. बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड (५०),दीपाली गायकवाड (१८), अजित गायकवाड (२२) अशी मृतांची नावं आहेत. मृत व्यक्ती श्रीरामपूर तालुक्यातील जुने नायगाव येथील रहिवाशी होते. या घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे.

Shrirampur accident update
'माझी पोलीस सुरक्षा काढून टाका', एकनाथ शिंदे गटातील खासदाराचे पोलिसांना पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब गायकवाड त्यांच्या मुलांसह श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यने त्यांच्या दुचाकीने प्रवास करीत होते. त्यावेळी श्रीरामपूरच्या दिशेनं येणाऱ्या टॅंकरने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तिघांनाही जोरदार धडक बसून दिपालीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा अजितला उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले.

पंरतु, बाळासाहेबांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अजितला पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात येत होते. मात्र, प्रवासादरम्यान अजितचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची घटना घडल्यानंतर टॅंकर चालकाने पळ काढला. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com