धक्कादायक! अकोल्यात दोन दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

अपघात एवढा भीषण होता की, दोघे जागीच ठार झाले.
धक्कादायक! अकोल्यात दोन दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
AccidentSaam tv

अकोला: अकोल्यातील बाळापूर- पातूर रोडवर वाडेगावजवळ दोन दुचाकींच्या धडकेत (Accident) तीन जण ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. घटनास्थळी मदत मोहिम राबवण्यात आली, पण गंभीर जखमी झाल्यामुळे तिघांचा मृत्यू (Death) झाला.

Accident
Raigad | घोणसे घाटात बसला अपघात; २ जणांचा मृत्यू, ५०हुन अधिक जण जखमी

पोलीस (Police) घटनास्थळी उपस्थित होऊन. या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अकोल्यातील बाळापूर-पातूर रोडवर वाडेगावनजीक दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने तीन जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली. दोन दुचाकींची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सदर घटना रात्री घडली. दोघांनाही बाळापूर येथे शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघे जागीच ठार झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बाळापूर पोलीस (Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.