तलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा!

अलिबाग न्यायालयाने ठोठावली शिक्षा; तिघांविरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल !
तलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा!
तलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा!SaamTv

-- राजेश भोस्तेकर

रायगड : शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे तीन आरोपींना चांगलेच महागात पडले आहे. आपले कर्तव्य बजावत असलेल्या तलाठ्याला आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी अलिबाग (Alibag) सत्र न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा (Punishment) सुनावली असून दंडही ठोठावला आहे.   १९ फेब्रुवारी २०१८ रोजी अलिबाग रोहा रोडवर वावे वळवली बस स्टॉपच्या दरम्यान ही घटना घडली होती.

हे देखील पहा :

मातीने भरलेले चार ट्रक तलाठी कमलाकर गायकवाड आणि तलाठी सुदर्शन सावंत यांनी थांबवून कायदेशीर कारवाई करत होते. यावेळी आरोपी सुधीर धर्मा चेरकर, हेमंत दशरत चेरकर, मनिष नथुराम पाटील यांनी तलाठी कमलाकर गायकवाड शिविगाळी करून काठीने मारहाण (Beating) केली होती. या प्रकरणी त्या तिघांविरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अन्वये रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा!
अडीच कोटींच्या हारवेस्टरपायी शेतकऱ्यांनी विकली 17 एकर जमीन; कंपनीकडून फसवणूक!

या प्रकरणाची सुनावणी तदर्थ जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात (Court) झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून स्मिता राजाराम धुमाळ यांनी काम पाहीले. सुनावणी दरम्यान एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी कमलाकर गायकवाड, साक्षीदार सुदर्शन सावंत, तहसिलदार प्रकाश संकपाळ, वैद्यकीय अधिकारी शितल जोशी, पंच शेखर बळी आणि तपासित अमंलदार जी पी म्हात्रे यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर तिनही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. आणि एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच दंडही ठोठावला.

Edited By : Krushnarav Sathe

तलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा!
Pune : ४० फुटांवरून लोखंडी सळई निसटली आणि १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावर पडली; मुलाचा जीव धोक्यात !
तलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा!
जुन्नरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने केली ५१ वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या !
तलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा!
Pune : सांगवीत ब्रायडल स्पा अँड ब्युटी सेंटर मध्ये सुरु होते सेक्स रॅकेट !

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.