Swine Flu: नागपुरात तीन ‘स्वाईन फ्लू’ संशयितांच्या मृत्यूने खळबळ; आरोग्य विभाग कारणं शोधणार

Swine Flu In Nagpur: मागील काही दिवसांपासून नागपुरात ‘संसर्गजन्य’ आजाराचे रुग्ण वाढत आहे.
Swine Flu In Nagpur
Swine Flu In NagpurSaam TV

नागपूर: नागपूर शहरात (Nagpur) तीन स्वाईन फ्लू संशयितांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या तीन स्वाईन फ्लू संशयितांच्या मृत्यू विश्लेषणावर आज आरोग्य विभागाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. नागपूरात कोरोना, (Corona) डेंग्यूनंतर आता 'स्वाईन फ्लू'ची दहशत पसरली आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे ६७ रुग्ण आढळले आहेत. याबाबत प्रशासनाने मेडिकल शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. (Nagpur Swine Flu News)

हे देखील पाहा -

नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची सख्या वाढत असतानाच आता 'स्वाइन फ्लू' ने डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून नागपुरात ‘संसर्गजन्य’ आजाराचे रुग्ण वाढत आहे. अशातच आता ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढल्याने नागपूरकरांचा धोका वाढला आहे. अशात तीन स्वाईन फ्लू संशयितांच्या मृत्यूने खळबळ नागपूरात उडाली आहे.

आरोग्य विभाग रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधणार

महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वैद्यकीय तज्ज्ञ तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय तज्ज्ञ मृत्यू विश्‍लेषण समितीमध्ये मृतकांच्या केस पेपरवरून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात येणार आहे. माता आणि बालमृत्यूसंदर्भात या समितीची बैठक दर महिन्याला होत असते. मात्र संशयित डेंग्यू किंवा स्वाइन फ्लुने झालेल्या मृत्यूवर शिक्कामोर्तब समितीमध्ये चर्चा झाल्यानंतरच केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Swine Flu In Nagpur
Swine Flu: नागपूरात कोरोना पाठोपाठ आता 'स्वाईन फ्लू'चा धोका

जनजागृतीवर भर

दरम्यान रुग्णांची वाढती संख्या पाहता आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्लू संशयितांचे नमुने मोठ्या संख्येने विविध शासकीय प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात येत आहे. सोबतच हा आजार आढळणाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत पोहचण्यासह या आजाराच्या जनजागृतीवरही भर दिला जात असल्याची महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com