
अकोला : जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch police) पर्दाफाश केला असून चोरट्यांकडून 7 लाख 31 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. १४ ठिकाणी घरफोड्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी (Thief arrested) तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आशिष इश्वर लोडाया (25), पुर्वेश राजेश शाह (२८), शिवम विरेंद्र ठाकूर (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दरम्यान, वैयक्तीक आयुष्यात मौजमजा करण्यासाठी (robbery crime) चोरी करत असल्याची कबुली या आरोपींनी पोलिसांना दिलीय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात चोरट्यांनी १४ ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. खदान पोलिस स्टेशन परिसरामध्ये सहा ठिकाणी,सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत 2 ठिकाणी, जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत 2 ठिकाणी,अकोट फाईल, मूर्तिजापूर शहर,पातूर पोलिस स्टेशनमध्ये एक वेळा चोरी झाल्याची घटना घडली होती.
त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवत चोरांच्या टोळीला जेरबंद केले.राधाकिसन प्लॉटमधील आरोपी आहेत.केतकी अपार्टमेंट,श्रीनाथ अपार्टमेंट आणिन्यू राधाकिसन प्लॉट येथे उच्चभ्रू ठिकाणी हे चोर राहायचे.दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने या चोरट्यांकडून 6 लाख 46 हजार 370 रुपये किमतीचे 163.4 ग्रॅम सोने, 1380 ग्रॅम चांदी किंमत 56 हजार 370 रुपये, 29 हजारांची कॅश, असा एकूण 7 लाख 31 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.