Mahavitran News : शॉक लागून तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; महावितरणने घेतली गंभीर दखल

या घटनेमुळे मावसकर कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.
mahavitran
mahavitransaam tv

- अमर घटारे

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील उंबरी एका वीट भट्टीनजीक अर्पित राम मावसकर (वय तीन) याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे मावसकर कुटुंबावर डाेंगर काेसळला. या घटनेनंतर महावितरणने घटनास्थळाचा पंचनामा करुन चुकीच्या पद्धतीने विद्युत यंत्रणा कार्यान्वित केली असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करु अशी माहिती महावितरण (mahavitran) अधिका-यांनी दिली आहे.

mahavitran
Karuna Sharma News : कार्यकर्त्यांना काय पाठवताय, स्वत: लढ; धमकीनंतर करुणा शर्मांचे धनजंय मुंडेंना चॅलेंज

या घटनेबाबत चेतन मोहोकर (उपकार्यकारी अधिकारी, वीज वितरण कंपनी, दर्यापूर) म्हणाले शुभम गजानन बचे यांच्या शेतामध्ये वीटभट्टी आहे. येथे मजूरांना राहण्यासाठी झाेपडीवजा खाेल्या आहेत. त्या ठिकाणी विद्युत पूरवठा करण्यासाठी सुमारे दाेनश ते अडीचशे मीटरवरुन विद्युत वाहिनीच्या तारावरून वीज घेतली गेली असावी. (Maharashtra News)

mahavitran
Kankavali Political News : कणकवलीत नितेश राणे, वैभव नाईक समर्थकांत वाद, धक्काबुक्कीनंतर वातावरण तापलं

हा विद्युत पूरवठा अनधिकृत आहे. या ठिकाणी याेग्य ती काळजी घेतली गेलेली नाही. त्यामुळे लहान मुलाचा शाॅक लागून मृत्यू झाला असावा. या घटनेचा (incident) पंचनामा करुन दाेषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच पाेलिस (police) ठाण्यात वीज चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे चेेतन माेहाेकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com