बीडच्या मादळमोही गावात थरार....भर दुपारी तरुणावर गोळीबार

घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद
बीडच्या मादळमोही गावात थरार....भर दुपारी तरुणावर गोळीबार
बीडच्या मादळमोही गावात थरार....भर दुपारी तरुणावर गोळीबारSaam Tv

बीड - जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार Firing करण्यात आला. मात्र सदरील तरुणाचे दैव बलवत्तर व वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले आहेत. हि थरारक घटना बीडच्या Beed मादळमोही गावात काल शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान घडली सून हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये CCTV Camera कैद झाला आहे.

हे देखील पहा -

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व बांधकाम साहित्याचे दुकान आहे. यादरम्यान काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या दुकानासमोर पवन गावडे हे थांबले होते. यावेळी अचानक दोन तरुण मोटारसायकलवरुन आले व जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्याला पिस्टल लावून गोळी झाडली.

बीडच्या मादळमोही गावात थरार....भर दुपारी तरुणावर गोळीबार
व्हाट्स अ‍ॅपवर स्टेट्स टाकत मृत्यूला कवटाळले

यावेळी गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात संजय पवार व अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com