पिवरडोल शेत शिवारात तरूणावर वाघाचा हल्ला; युवकांचा जागीची मृत्यू

झरी तालुक्यातील पिवरडोल शेतशिवारात एका तरुणावर वाघाने हल्ला करून त्याचा फडशा पाडला.
पिवरडोल शेत शिवारात तरूणावर वाघाचा हल्ला; युवकांचा जागीची मृत्यू
पिवरडोल शेत शिवारात तरूणावर वाघाचा हल्ला; युवकांचा जागीची मृत्यूसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ -  झरी Zari तालुक्यातील पिवरडोल शेतशिवारात एका तरुणावर वाघाने Tiger हल्ला Tiger attack करून त्याचा फडशा पाडला. सदर घटना सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अविनाश पवन लेनगुरे असे मृतकाचे नाव आहे. सदर घटना माहिती होताच घटनास्थळावर लोकांची गर्दी झाली आहे. Tiger attack on youth

झरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर पाटणबोरी पासून 4 किलोमीटर अंतरावर पिवरडोल हे गाव आहे. गावात अविनाश पवन लेनगुरे (17) हा तरुण राहायचा तो 10 वर्गात शिकत होता. रात्री 9 वाजताच्या सुमारास तो गावाला लागलेल्याच शेतशिवारात गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी न आला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबातील काही लोकांनी इतर व्यक्तींना सोबत घेऊन त्याला शोधायला निघाले.

हे देखील पहा -

गावालगतच असलेल्या शेत शिवारात अविनाशच्या कुटुंबीयांना वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. तसेच अविनाशचे टमरेल, मोबाईल व रक्त आढळून आले. त्यामुळे त्यांनी आजूबाजुला बघितले असता झुडपातून त्यांना वाघ दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला व पोलीस स्टेशनला दिली. Tiger attack on youth

पिवरडोल शेत शिवारात तरूणावर वाघाचा हल्ला; युवकांचा जागीची मृत्यू
ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या कारवाई विरोधात शेतकरी आक्रमक...

सकाळी वाघाने हल्ला केल्याची माहिती पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली. सुमारे 2 हजार लोकांची गर्दी घटनास्थळावर गर्दी झाली आहे. वाघाचे अद्यापही शिकार खाणे सुरुच होते. घटनास्थळी वनविभागाची टीम दखल झाली असून पाटण पोलिसांची टीम देखील दाखल झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com