Tiger Death Rate: जंगलाच्या राजाचा जीव धोक्यात, 2021 मध्ये देशात 139 वाघांचा मृत्यू

जंगलाचा राजा वाघाच्या मृत्यूदरात (Tiger Death Rate) तब्बल 33 टक्क्यांनी वाढ झालीये.
Tiger Death Rate
Tiger Death RateSaam Tv

नागपूर : जंगलाचा राजा वाघाच्या मृत्यूदरात (Tiger Death Rate) तब्बल 33 टक्क्यांनी वाढ झालीये. गेल्या वर्षी देशात तब्बल 139 वाघांचा मृत्यू झालाय. ही आकडेवारी निश्चितच धक्कादायक आहे. या मृत्युंची कारणं वेगवेगळी असली तरी हीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात वाघांचं अस्तित्व राहील का? असा प्रश्न निर्माण झालाय (Tiger Death Rate Increases By 33 Percent 139 Tigers Died In 2021).

Tiger Death Rate
विस्‍तार अधिकारीकडून वाघसदृश्‍य प्राण्याचे कातडे व नखे तस्करी; गुजरात पोलिसांनी केली अटक

देशात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना दुसरीकडे झपाट्यानं कमी सुद्धा होत आहे. गेल्या वर्षी तब्बल 139 वाघांचा मृत्यू झालाय. 2020 मध्ये 106 वाघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये मृत्यू दरात 33 टक्क्यांनी वाढ झालीये. वाघांच्या मृत्युची कारणं वेगवेगळी आहेत. यात शिकार, वीजप्रवाह, रस्ते अपघात, अधिवास, अस्तित्वाची लढाई तसेच नैसर्गिक मृत्यू ही वाघांच्या मृत्युची कारणं आहेत. मात्र, जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्यानं वाघांच्या मृत्यूदरात वाढत होत असल्याचं वास्तव आहे.

Tiger Death Rate
बार्शीची साक्षी इंगोले मागच्या 20 दिवसांपासून गायब; चित्रा वाघ यांचा प्रशासनाला सवाल!

गेल्या गेल्या वर्षाची आकडेवारी बघितली तर वाघांच्या (Tiger) मृत्युदरात सातत्याने वाढ होत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची आकडेवारी आणि व्याघ्र संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या आकडेवारीत फरक आहे. व्याघ्र संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांची आकडेवारी ही अधिक आहे.

वर्ष मृत्यू

2012 88

2013 68

2014 78

2015 82

2016 121

2017 117

2018 101

2019 96

2020 106

2021 139

जंगलातील जीवनचक्र सुरळीत चालण्यासाठी सर्वच प्राण्यांचं महत्व आहे. त्यातही वाघांचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे वाघांचा मृत्यूदर वाढणं हे चांगले लक्षणं नाही. त्यामुळे वाघांचं रक्षण आणि त्यांच्या संवर्धनासाठी वन विभागानं गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com