गोंदिया: विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार; वनविभागाकडून 6 जणांना अटक

अंधश्रद्धेतून वाघाची शिकार केल्याचे स्पष्ट.
गोंदिया: विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार; वनविभागाकडून 6 जणांना अटक
Gondia News In Marathiअभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

गोंदिया : गोंदिया वनक्षेत्र अर्जुनी मोरगाव येथे रामघाट जंगलात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार करणाऱ्या 6 आरोपी गोंदिया वन विभागाने (Forest Department) अटक केली आहे. धनराज चचाने, ज्ञानेश्वर वाघाड़े, शरद मरकाम, विकास नेवारे, विलास सिखरामे व धनपाल कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे असून आरोपी कडून वाघाचे 2 सुळे दात, वाघाच्या जबड्या ची हाडे, इतर लहान दात वाघाला मारण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अंधश्रदेतुन वाघाची शिकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Gondia News In Marathi)

Gondia News In Marathi
Fire Breaks Out In Kamala Building: मसिना, वोक्हार्ड आणि रिलायन्सने रुग्णांना नाकारलं, कारवाईचे आदेश देणार - महापौर

गोंदिया वनक्षेत्र अर्जुनी मोरगाव येथे ता. 13 जानेवारी रोजी रामघाट बिट भाग 1 तारीख वन कक्ष क्रमांक 254 बी मध्ये मृताअवस्थेत नर वाघ आढळल्याची घटना घडली होती. या प्रकरणी वनविभागाने गांभीर्याने तपास केला असता आरोपी धनराज चचाने, ज्ञानेश्वर वाघाड़े ह्यानी एका खाजगी शेतमालकाच्या शेतात असलेल्या विद्युत पंपासाठी असलेल्या विज पुरवठा मिटर मधुन विज चोरून त्याला विद्युत तारांच्या (Electric Wire) सहाय्याने दीड किलोमीटर पर्यंत नेला.

हे देखील पहा-

त्यानंतर सदर विज प्रवाहाच्या स्पर्शाने विज वाघाच्या मृत्य होत असे. कुऱ्हाडीचा सहाय्याने वाघाच्या जबड़ा कापुन नेला. घटना उजागर होताच वनविभागाने प्रकरण गंभीर्याने घेत गुप्त माहितीच्या आधारे 6 आरोपीला अटक केली आहे. आरोपींकडुन वाघ शिकार प्रकरणात लपवुन ठेवलेले 2 सुळे दात, वाघाच्या जबड्याची हाडे, इतर लहान दात व गुन्ह्यात वाघाच्या अवयवांचे तुकडे करण्यासाठी आरोपींनी वापरलेली कु-हाड वनविभागाने आरोपींकडुन जप्त केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.