ताडोबा जंगलातील थरार; पर्यटकांसमोर वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी

ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली आहे. विशेष म्हणजे, पर्यटकांच्या डोळ्यांसमोरच हा धक्कादायक थरार घडला
ताडोबा जंगलातील थरार; पर्यटकांसमोर वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी
ताडोबा जंगलातील थरार; पर्यटकांसमोर वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळीSaam Tv

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे (वय- ३८) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले आहे. ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली आहे. विशेष म्हणजे, पर्यटकांच्या डोळ्यांसमोरच हा धक्कादायक थरार घडला आहे. ताडोबात वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला आहे.

हे देखील पहा-

स्वाती ढुमणे ही ३ वनमजुरांसह त्यावेळेस जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण करत होते. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण आढळून आली होती. वाघिणीला पाहून त्यांनी आपला मार्ग बदलला होता. मात्र, काही वेळामधेच अचानक वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला चढविला आणि जंगलात फरपटत नेले आहे. ही घटनेची माहिती कळताच वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शोध घेतला असता, स्वाती यांचा मृतदेहच आढळून आला आहे.

ताडोबा जंगलातील थरार; पर्यटकांसमोर वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी
Jammu Kashmir: लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवादी साथीदारांना अटक, हिजबुल कमांडर ठार

या घटनेमुळे लगेच सर्व्हे थांबविण्यात आला, अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी यावेळी दिली आहे. वनविभागाच्या वतीने पती संदीप सोनकांबळे यांना ५ लाख १० हजारांची तातडीची मदत देण्यात येणार आहे. त्यांना ४ वर्षांची आरुषी नावाची मुलगी आहे. स्वाती ताडोबातील पहिल्या वन शहीद ठरले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com