'दाजीपूरात आम्ही वाघ पाहिला'; वन विभागाची शाेध माेहिम सुरु

यापूर्वी २०१९ मध्ये राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्यात लावण्यात आलेल्या कॅमेरात वाघाचे छायाचित्र मिळविण्यात वनविभागाला यश आले होते.
'दाजीपूरात आम्ही वाघ पाहिला'; वन विभागाची शाेध माेहिम सुरु
dajipur sanctuary

काेल्हापूर (kolhapur) : दाजीपूर अभयारण्यात (dajipur sanctuary) गव्यांचा वावर असल्याचे नेहमीच आपण पाहत आलाे आहाेत. साेमवारी वन्यजीव प्रेमींसह पर्यटकांना सावराई पठारानजीक वाघ दिसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दाजीपूर वन्यजीव अभयारण्यास भेट देणा-या वनप्रेमी, वन्यजीवप्रेमी तसेच पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील श्रीरंग चौगले यांना सफारी करताना वाघ (tiger) दिसला. दरम्यान वनविभागाने (forest) अभयारण्यात एका बैलाची शिकार झाल्याची पद्धत पाहत दाजीपूरात (radhanagri) वाघ असावा इतकाच दुजाेरा दिला आहे.

dajipur sanctuary
भाविकांनाे! ३१ डिसेंबरला शिर्डीत जाणार आहात? नवी नियमावली पहा

दाजीपूर वन्यजीव अभयारण्यात (dajipur wildlife sanctuary) पर्यटकांना (tourists) वाघ दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २०१९ मध्ये राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्यात लावण्यात आलेल्या कॅमेरात वाघाचे छायाचित्र मिळविण्यात वनविभागाला यश आले होते. साेमवारी हातकणंगले तालुक्यातील हुपरीचे रहिवासी श्रीरंग चौगले यांना वाघ दिसल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “मी कुटुंबियांसमवेत आणि मित्रांसह दाजीपूरात सफारीला गेलो होतो. आम्हांला एकही प्राणी दिसला नाही म्हणून खूप नाराजी झालाे हाेता.

सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास आम्ही सावराई पठारावरील वॉच टॉवरजवळ परतत असताना संकेत जाधव (गाईड) यांनी आम्हांला आमच्या वाहनापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर गव्यांचा कळप दाखवला. आमची जीप त्यांच्या जवळ जाताच गवे सावध झाले आणि माेठ माेठ्याने आवाज करू लागले. त्यावेळी काही अंतरावरुन एक वाघ जाताना आम्हांला दिसला. पट्टेर वाघ टिपण्याचा माेह आम्हांला आवरला नाही. परंतु खराब प्रकाशामुळे (सायंकाळचे वातावरण असल्याने) ते कॅमेराबद्ध करु शकलाे नाही. वाघ दिसल्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे चाैगुलेंनी नमूद केले.

बैलाचे शव सापडले

आजरा-आंबोली भागातील किटवडे वनपरिक्षेत्रात सोमवारी सायंकाळी एका बैलाचा मृतदेह आढळून आला. शिकारीची शैली पाहता वाघाने केली असावी असा अंदाज वनपालांना वाटत आहे. वन विभागाचे पथकाने संपुर्ण परिसर पिंजून काढला. परंतु ठाेस असे काही हाती लागले नाही. दरम्यान किटवडे वनक्षेत्रात आजपर्यंत वाघ दिसलेला नाही असे वन विभागाने स्पष्ट केले.

वाघाची शक्यता

आजरा विभागाच्या वनक्षेत्रपाल स्मिता डाके म्हणाल्या, “किटवडे येथील शेतकरी दत्तात्रय झेंडू- चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात त्यांची गुरे चरण्यासाठी मोकळी सोडली होती. त्यापैकी एक बेपत्ता झाले हाेते. सोमवारी सायंकाळी जंगल परिसरात बैलाचा मृतदेह आढळून आला. वनपाल सुरेश गुरव व वनरक्षक राहुल कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन मृत बैलाची पाहणी केली. या बैलावर मागून वार केल्याचे आढळले तसेच त्याच्या मानेवर जखमा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिकारीची पद्धत पाहता चंदगड किंवा आंबोली भागातून वाघ आला असण्याची शक्यता आहे.

ठसे आढळले नाही

वनरक्षक राहूल कांबळे म्हणाले ज्या ठिकाणी मृत बैल सापडला ताे परिसर अत्यंत घनदाट आहे. आम्ही मंगळवारी देखील संपुर्ण परिसर पिंजून काढला. परंतु वाघाचे ठसे (tiger pugmark) आढळले नाहीत. दरम्यान शिकाराची शैलीवरून हे वाघाचेच काम असावे. या परिसरात तसेच आजूबाजूला बिबट्याही आहेत, पण तगडा बैल मारणे बिबट्यासाठी सोपे नाही असेही कांबळे यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.