Tiger Injured: रानडुकराची शिकार करताना वाघच झाला जखमी; नेमकं काय घडलं?

Yavatmal News: रानडुकराची शिकार करताना दोन वाघांपैकी एक वाघ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Melghat Tiger Reserve
Melghat Tiger ReserveSaam Tv

संजय राठोड

Yavatmal News Today: रखरखत्या उन्हामुळे यवतमाळच्या टीपेश्वर अभयारण्यातील वाघांचा जीवही कासावीस झाला आहे. त्यामुळे हे वाघ पाण्यात डुबकी लावण्यासाठी पाणवठ्यावर येत आहे. पर्यटकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी वाढली आहे. (Latest Marathi News)

Melghat Tiger Reserve
Beed News: मित्रच निघाला शत्रू! अपहरण करून मागितली 20 लाखांची खंडणी; गुन्हा दाखल...

दरम्यान, पाणवठ्यावर आलेल्या दोन वाघांपैकी एक वाघ जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे. हा जखमी वाघ पर्यटकांच्या कॅमेरात (Camera) कैद झाला असून वन विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहे. या दोन वाघांपैकी एक नर तसेच एक मादी आहे.

यातील मादी जातीचा वाघ (Tiger) रानडुकराची शिकार करताना जखमी झाल्याची माहिती आहे. या वाघाच्या मागील पायाच्या मांडीवर जखम झाली आहे. ही जखम जवळपास दीड इंच लांब आहे. रानडुकराची शिकार करतांना दात लागल्यामुळे या वाघाला जखम झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Melghat Tiger Reserve
Nashik Bus Driver End Life: नाशिकला जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये बिघाड, चालकाने टोकाचं पाऊल उचलत संपवलं जीवन

अनेक पर्यटकांनी या जखमी वाघाला आपल्या कॅमेरात कैद केले. सफारी मधील जिप्सीवर कार्यरत गाईड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे टिपेश्वर अभयारण्याचे वन अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी या भागावर लक्ष ठेवून आहे. या दोन्ही बछड्यांना त्यांच्या आईने सोडून दिल्यानंतर आता हे वाघ स्वतः शिकार करत आहे. शिकार करीत असताना वाघ सुद्धा अनेकदा जखमी होत असल्याची माहिती व्याघ्र तज्ञांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com