बीड: बसस्थानकात वडापाव, पाणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
बीड: बसस्थानकात वडापाव, पाणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळSaam TV

बीड: बसस्थानकात वडापाव, पाणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ

एसटी कर्मचाऱ्याचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा बीडमध्ये गेल्या 15 दिवसापासून संप सुरू आहे.

बीड : एसटी कर्मचाऱ्याचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा बीडमध्ये गेल्या 15 दिवसापासून संप सुरू आहे. यामुळे एसटीवर अवलंबून असलेल्या पोटावर उपासमारीची वेळ आली आहे. बीड बस स्थानकात वडापाव, पाणी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यासह हमाली काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपामुळे आमचं दिवाळ निघालं, राज्य सरकारने एसटी सुरू करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा. अशी मागणी खाद्यपदार्थ, फळ आणि पाणी विक्रेत्यासह हमालांनी केली आहे.

बीड: बसस्थानकात वडापाव, पाणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
औरंबादमध्ये '30-30' घोटाळा !; भरघोस व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक

बीड बसस्थानकामध्ये गेल्या वीस वर्षापासून पाणी आणि खाद्यपदार्थ विकणार्‍या, नवनाथ चव्हाण यांच्यावर संपामुळे बेरोजगारीची वेळ आली आहे. यामुळं त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एसटी सुरू होती त्यावेळेस दिवसाचे पाचशे रुपये मिळायचे, मात्र आज शंभर रुपये मिळणे देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे कुटुंब चालवाव कसं? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तसेच लवकरात लवकर एसटीच्या संपाचा तोडगा काढून, ही लालपरी पुन्हा सुरू व्हावी. अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

बीड बसस्थानकात पाणी विक्री करणाऱ्या सुरेश अंकुशे यांची परिस्थिती देखील काही वेगळी नाही. पाण्याची बॉटल विक्री करून घर गाडा आणि संसार करणाऱ्या सुरेश अंकुशेवर आज आर्थिक संकट ओढवले आहे. दीडशे रुपयात घर भागवाव कसं ? एसटी सुरू होती त्यावेळेस 50 ते 70 बॉटल विक्री व्हायच्या. त्यातून चारशे ते पाचशे रुपये राहायचे. मात्र आता पंधरा वीस बॉटल देखील विक्री होत नाहीत. दिवसभर फिरल्यानंतर शंभर ते दीडशे रुपये नफा राहतो. त्यामुळे कुटुंब चालवावं कसं ? पाच माणसे जगवावी कसे ? असा प्रश्न सुरेश अंकुशे यांनी उपस्थित केलाय.

एसटीच्या पार्सल मुळे आम्हाला हमालीचे काम मिळायचे, मात्र 27 तारखेपासून संप असल्यामुळे हातचे काम गेले आहे. एसटी सुरू होती त्यावेळेस पाच - सातशे रुपये हमाली मधून राहायचे. आज बाहेर काम देखील मिळत नाही, त्यामुळं हमाली काम करणाऱ्या शेख जमील यांच्यावर आर्थिक संकट ओढवलंय.तर तीन महिन्याचा किराणा एकदाच भरल्यामुळे आज घरात किराणा आहे, मात्र तो संपला तर उद्या भरायचा कसा ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला

बस स्थानक परिसरात स्टेशनरी व खाद्यपदार्थाचे दुकान असलेल्या, दुकानदाराला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. दिवाळी हा आमचा धंद्याचा सिजन असतो. आणि याच वेळेत संप झाल्यामुळे आज दुकानाचं भाडं भरावं कसं ? 25 हजार रुपये महिन्याला भाडं द्यावं लागत, त्यामुळे भाडे खर्च देखील मिळत नाही. संपामुळे या दिवाळीत आमच दिवाळ निघालं आहे. वीस दिवसापासून संप सुरू असल्याने बसस्थानकामध्ये कोणीही फिरकत नाही. म्हणून दुकांनाचे भाडे कसे भरावे ? असा प्रश्न सय्यद अनिज यांनी व्यक्त केला.

बीड: बसस्थानकात वडापाव, पाणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
बीडच्या गोळेगावात उसाच्या फडात जाऊन मजुरांचं कोरोना लसीकरण

दरम्यान एसटीच्या संपामुळे बीड जिल्ह्यातील एसटी आगाराचे साडेपाच कोटीचे नुकसान झाले आहे. त्याच तुलनेत एसटीवर अवलंबून असलेला पोटांचा देखील प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. खाद्यपदार्थ विक्रेते, हमाल आणि दुकानदार यांच्यासमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे लवकरात लवकर एसटीचा संपाचा तोडगा काढावा व संप मिटवावा. अशीचं मागणी केली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com