Akola News: दुर्दैवी! कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

सततच्या नापीकीला कंटाळून अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील कोठा येथील एका शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
Akola News
Akola NewsSaam Tv

Akola Farmer News: सततच्या नापीकीला कंटाळून अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील कोठा येथील एका शेतकऱ्याने स्वताच्या शेतातील जाभांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नंदकिशोर लढे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

Akola News
Beed News : लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बीड पोलिसांची मोठी कारवाई

त्याच्या वडिलांच्या नावाने आणि काही नंदकिशोरच्या नावाने मिळून अडीच एकर शेती आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 2020मध्ये घेतलेले 56 हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना (Farmer) नव्याने कर्ज मिळाले नाही अशा परिस्थितीत समोर खरीप हंगामात बियाणे खते व शेताची मशागत कशी करावी शिवाय काही उसनवारी घेतलेला पैसा कसे फेडावे या प्रकाराने नंदकिशोर हा चिंतेत होता.

त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत कर्जाला कंटाळून आपली जिवन यात्रा संपवली. आईवडिलांना एकुलता एक असलेल्या नंदकिशोरने वेगवेगळा व्यवसाय करुन तो आपल्या वृद्ध आई वडील व कुटुबियांचा कसा तरी उदरनिर्वाह भागवित होता. अशातच गत वर्षापासूनच्या होणाऱ्या नापीकीमुळे तो तणावात होता. (Akola News)

Akola News
Mumbai Ganeshotsav: मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती बंधनकारक

वडिलांच्या नावाने असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Bank) कर्ज कसे फेडावे हा प्रश्नही नंदकिशोरला सतावत होता. या सर्व प्रकाराला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वताला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी (Police) घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुबियाच्या स्वाधीन केले आहे. मृतक नंदकिशोर यांच्या पश्चत आई ,वडील, बहीनी, दोन मुले असा परिवार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com