हे तर तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासारखं हाेईल; टास्क फाेर्स

हे तर तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासारखं हाेईल; टास्क फाेर्स
subhash salokhe member state task force

सांगली : काेरोनाच्या corona काळात निवडणुका elections घेणे म्हणजे राज्यात तिसऱ्या लाटेला covid19 third wave आमंत्रण देण्यासारखं आहे असे स्पष्ट मत राज्याच्या टास्क फोर्सचे संचालक डॉ. सुभाष साळोखे subhash salokhe यांनी येथे व्यक्त केले. आगामी काळात जर सार्वत्रिक निवडणूक, सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्यास तिसऱ्या लाटेसाठी आपण स्वतःहून पायावर दगड मारून घेण्यासारख आहे असेही डॉ. साळोखे यांनी नमूद केले. (to-avoid-coronavirus-third-wave-election-social-programs-should-be-restircted-task-force)

तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज असल्याचे सांगून तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक खबरदारी घेतली असून लोकसहभाग झाला तर तिसरी लाट येणारही नाही. नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले पाहिजे असे मतही डॉ. साळोखे यांनी व्यक्त केले.

सांगली जिल्ह्यात आज त्यांनी विविध ठिकाणी पाहणी केली. जिल्ह्यात काही ठिकाणी निवडणुका झाल्या त्यामुळे कोरोना वाढला आहे. तसेच नागरिकांनी कोरोना झाल्यावर होम आयसोलेशन वर भर दिला आहे. अनेक जण उशिरा रुग्णालयात दाखल झाले याचा परिणाम सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढण्यात झाला आहे असेही डाॅ. साळाेखे यांनी नमूद केले. सांगली जिल्ह्यात या महिना अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल असा विश्वास टास्क फोर्सच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान वाढती रुग्ण संख्या कमी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही सांगली शहरात आज (गुरुवार) भाजीपाला आणि काही दुकाने उघडली होती. काही भागात नागरिकांची माेठी गर्दी झाली हाेती. वारंवार पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन गर्दी टाळा असे सांगत असली तरी गर्दी हाेत असल्याने ही गर्दी हटविण्यासाठी पाेलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला.

subhash salokhe member state task force
Lockdown Updates | लॉकडाऊन विरोधात साताऱ्यात व्यापारी कुटुंबासह रस्त्यावर

काही भागात दुकानात बाहेरून शटर बंद आणि आतून दुकान चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांचा भंग झाल्यास कोरोनाचे रुग्ण वाढतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. शहरात मास्क न घालणारे विनाकारण बाहेर पडणारे आणि दुकान उघडून आतून व्यापार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com