CM Uddhav Thackeary: तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर...

कोरोनाला क्रॉस करुन पुढे जायचे असेल तर, प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकायचे आहे.
CM Uddhav Thackeary: तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर...
CM Uddhav Thackeary: तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर... Saam Tv news

राज्यातील कोरोना (Covid 190 परिस्थिती नियंत्रणात आली असं आपण म्हणू शकतो. पण जर राज्यात जर तिसरी लाट अपरिहार्य असेल तर त्यासाठी आपण तिसरी लाट ((3rd Wave) येऊ नये, तिची घातकता कमी कशी करता येईल. यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यासाठी रुग्णालय (hospitals) प्रशासन, डॉक्टर्स (Doctors), पोलीस यंत्रणा (Police Force), स्वच्छचा कर्मचारी आदींनी सज्ज असलं पाहिजे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी दिली आहे. माझा डॉक्टर ऑनलाईन वैद्यकीय परिषदेत ते बोलत होते.

हे देखील पहा-

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आज मुख्यंमंत्र्यांनी कोविड टास्क फोर्स आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी राज्याला संबोधित केले. तिसऱ्या लाटेसाठी आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन काम करायचे आहे. त्यासाठी डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, फायर ब्रिगेड आदी यंत्रणांनी सज्ज राहिले पाहिजे. औषधांचा साठा, ऑक्सिजनचा साठा, रुग्णालयांची यंत्रणा आदींचे ऑडिट करायला हवे.

कोरोनाचा प्रभाव वाढण्याआधीच रुग्णालयांनी सर्व परिस्थीचे ऑडिट करायला हवे. रुग्णांच्या तुलनेत आपल्याकडे असलेली यंत्रणा पुरेशी आहे की नाही, नसेल तर त्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर, रुग्णसंख्या वाढून नये यासाठी देखील आपण प्रयत्नशील असायाला हवे. कोरोनाला क्रॉस करुन पुढे जायचे असेल तर, प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकायचे आहे. काळजी घेताना, हे ऊघडा ते ऊघडा अशी घाई काहीजण करत आहेत, पण जर ते उघडले आणि कोरोनाचे संक्रमणही वाढले तर ते पुन्हा बंद करावे लागणार, तसे होऊ नये यासाठीही आपण सावधगिरीने पावलं टाकत आहोत.

CM Uddhav Thackeary: तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर...
Raj Thackeray: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर करुन निवडणूका पुढे ढकलण्याचा घाट

दुसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता यावेळी सव्वा लाखांच्या आसपास बेड वाढलवले आहेत पण त्यांना ऑक्सिजन पुरवठा करु शकतो हे पाहणे आवश्यक आहे. आधीच्या लाटेत ८० हजार रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. पण अपुऱ्या साठ्यामुळे तो आपल्याला बाहेरुन आणावा लागला. तोपर्यंत रुग्णच नव्हे तर संपुर्ण यंत्रणाच श्वास रोखून बसली होती.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com