St Bus Accident: एसटीचा प्रवास की मृत्यूची वाट? 17 महिन्यात एसटी बसचे 99 अपघात, 10 प्रवाशांचा मृत्यू

Today Accident News in Maharashtra: एसटीचा प्रवास की मृत्यूची वाट? 17 महिन्यात एसटी बसचे 99 अपघात, 10 प्रवाशांचा मृत्यू
Buldhana St Bus Accident
Buldhana St Bus AccidentSaam Tv

Buldhana St Bus Accident: एसटी बस संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात १ जानेवारी २०२२ ते २४ मे २०२३ या १७ महिन्यात एसटीचे तब्बल ९९ अपघात होऊन त्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

तर ३९ प्रवाशी गंभीर आणि ४० प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पळसखेड चक्का येथे कंटेनर व बसच्या झालेल्या अपघातानंतर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. दरम्यान या अपघातानंतर आता चौकशी सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.

Buldhana St Bus Accident
Mumbai University Admission 2023: बारावीचा निकाल लागला, आता मिशन अ‍ॅडमिशन! एफवाय प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

अपघातानंतर नियंत्रण समिती तीनचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गाभणे, प्रादेशिक अभियंता अविनाश राजगुरे, विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे, यंत्र अभियंता मसकर व अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने २३ मे रोजी सिंदखेड राजा येथील अपघातस्थळाची पाहणी केली. आता या अपघाताची चौकशी करून त्याचा एक अहवालही वरिष्ठस्तरावर दिला जाणार असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात एसटीचे ९९ अपघात झाले असून त्यातील ६४ अपघात हे २०२२ या वर्षातील आहे तर २०२३ मध्ये आतापर्यंत एसटीचे ३५ अपघात झाले असून यामध्ये पाच प्राणांतिक अपघातांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे.

Buldhana St Bus Accident
Mumbai University Admission 2023: बारावीचा निकाल लागला, आता मिशन अ‍ॅडमिशन! एफवाय प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

यातील सहा जण हे एकट्या पळसखेड चक्का येथील अपघातातील आहेत. दुसरीकडे अपघाताच्या कारणांवर अधिकाऱ्यांची चुप्पी पाहायला मिळत आहे. झालेल्या अपघातामध्ये चालक दोषी होते की यांत्रिक बिघाड होता किंवा त्रयस्थामुळे हे अपघात झाले आहेत.

याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले आहे. मात्र अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com