शहादा तालुक्‍यातील पिंगाने ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस...

पंतप्रधान आवास योजनेच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे लाभापासून वंचित राहिल्याने पिंगाणे ग्रामस्ठांनी उपोषण सुरु केले आहे.
शहादा तालुक्‍यातील पिंगाने ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस...
शहादा तालुक्‍यातील पिंगाने ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस...दिनू गावित

नंदुरबार: शहादा तालुक्‍यातील पिंगाने ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे लाभार्थी वंचित राहिल्याने हे उपोषण सुरु होते. जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे. (Today is the third day of the fast unto death of the villagers of Pingane in Shahada taluka)

हे देखील पहा -

नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीमुळे खासदार डॉक्टर हिना गावित यांनी थेट संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून गैर प्रकार झालेल्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. तरीदेखील जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांच्याद्वारे प्रत्यक्ष लाभार्थ्यांना डावलून त्यांच्या जवळचे असलेल्या नातेवाईकांना प्रथम लाभ दिला गेलेला आहे. शहादा तालुक्यातील पिंगाणे गावात घरकुल मंजूर झालेल्या यादीतील लाभार्थ्यांचे चुकीचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे.

शहादा तालुक्‍यातील पिंगाने ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस...
अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर प्रथमच अमेरिका तालिबानशी चर्चा करणार...

घरकुल योजनेसाठी सर्वेक्षण करणारा व्यक्ती आमच्या गावात आलेला नाही त्यांनी घरी बसून सर्वेची चुकीची माहिती दिल्याने पिंगाने गावातील जवळपास ७८ कुटुंब या योजनेपासून वंचित असुन त्यांनी शहादा प्रांत कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. यामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे. जोपर्यंत पात्र यादीतील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.