"आजचा 'बंद' हा शरद पवारांनी जाहीर केलेला; खुर्ची टिकवण्यासाठी हे करावं लागत"

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घाबरून अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले आहेत.
"आजचा 'बंद' हा शरद पवारांनी जाहीर केलेला; खुर्ची टिकवण्यासाठी हे करावं लागत"
"आजचा 'बंद' हा शरद पवारांनी जाहीर केलेला; खुर्ची टिकवण्यासाठी हे करावं लागत"SaamTV

कोल्हापूर : 'आजचा महाराष्ट्र बंद Maharashtra Bandha हा शरद पवारांनी Sharad Pawar जाहीर केलेला हा बंद आहे, खुर्ची टिकवायची असेल तर हे सगळं करावं लागतं' अशी खोचक टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे ते केवळ जनतेच लक्ष विचलित करण्यासाठी या सरकारचा प्रयत्न असल्याचही पाटील यावेळी म्हणाले. (Today's 'Maharashtra Bandh' was declared by Sharad Pawar)

हे देखील पहा -

लखीमपुर शेतकरी हत्या Lakhimpur farmer murder झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारतर्फे संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. आजच्या संमिश्र प्रतिसाद देखील पहायला मिळत आहे. मात्र आजचा बंद हा जनतेवरती लादलेला बंद असून बंदला सामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्तपणा कुठेही दिसत नाही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घाबरून अनेक व्यापाऱ्यांनी Merchants आपले व्यवहार बंद ठेवले असल्याचही पाटील यावेळी म्हणाले.

"आजचा 'बंद' हा शरद पवारांनी जाहीर केलेला; खुर्ची टिकवण्यासाठी हे करावं लागत"
'आजचा बंद म्हणजे, सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद;' देवेंद्र फडणवीसांच राज्य सरकारवर टीकास्त्र

मनसेचा बंदला विरोध...

मनसेने MNS देखील आजचा बंद करण्याची आवश्यकता काय होती आधीच कोरोना Corona मुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे Lockdown व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आजचा बंद करणं म्हणजे सामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं मत मनसेकडून व्यक्त करण्यात आलं आहे. तसेच राज्यातील पोलिसांनी Maharshtra Police राज्यात कुठेही नागरिकांवरती राज्य महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतडून बळजबरीने बंद लादला जात असेल त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या सामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाची तक्रार दाखल करुन घ्यावी आघाडी सरकारचे कार्यकर्ते असल्यासारख पोलिसांनी वागू नये असा सल्ला मनसे कडून देण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.