Hingoli Sugar Company : शेतकऱ्यांचे थकीत पैसे परत मिळणार?; हिंगोलीचा टोकाई साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश

सहकार आयुक्तांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत टोकाई साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
Hingoli Suger Company
Hingoli Suger CompanySaam TV

Sugar Company : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या टोकाई साखर कारखाना व्यवस्थापनाला राज्य सरकारने दणका दिला आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे २२ कोटी रुपये थकवल्याप्रकरणी राज्याच्या सहकार आयुक्तांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत टोकाई साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. (Sugarcane farmers)

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र प्राप्त झाले असून जिल्हा प्रशासन या पत्रानंतर आता जप्तीची कारवाई करणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी याबाबत विधिमंडळात सहकार मंत्री अतुल सावे यांना याबाबत सवाल केला होता. त्यानंतर सहकार आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हिंगोलीच्या वसमतमधील टोकाई सहकारी साखर कारखाना हा भाजपच्या ताब्यात आहे. या कारखान्यावर भाजपचे नेते शिवाजीराव जाधव यांचे वर्चस्व आहे. मात्र आता शेतकऱ्यांचे पैसे थकल्याप्रकरणी भाजपच्या ताब्यात असलेल्या या कारखान्यावर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Hingoli Suger Company
Sugar Factory : साखर कारखाना वाचविण्यासाठी हजाराे शेतक-यांनी शंभर ट्रॅक्टर, 50 बैलगाड्यांसह काढला माेर्चा

परंतु कारखाना जप्त करण्याऐवजी शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्याची मागणी आमदार राजू नवघरे यांनी केली आहे. तसेच याबाबत आपण शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या चालू हंगामातील २३.३० कोटींची थकित बिल शेतकऱ्यांना देणे शक्य नसल्याचे पत्र टोकाई कारखान्याने साखर आयुक्तांना दिले होते.

Hingoli Suger Company
Uddhav thackeray | ...म्हणून साखर कारखाना काढत नाही, मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी, पाहा व्हिडीओ

अपार कष्ट करून, शेतात घाम गाळून नेतकऱ्यांनी ऊस पिकवला मात्र हा ऊस कारखान्याला दिल्यावर त्यांनी त्याचा मोबदला दिला नाही. यामुळे शेतकरी हवालदील झालेत. त्यामुळे आमदार नवघरे यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. शेतकऱ्यांना मोबदला तर मिळालाच नाही, शिवाय बगॅस आणि मोलासेस देखील खुल्या बाजारात विकण्यात आलेत. याची देखील चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असं नवघरे यांनी म्हटलं होतं. त्यावर आता सहकार आयुक्तांनी हिंगोलीचा टोकाई साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com