राज्यातील मिनी लॉकडाऊन मुळे ताडोबातील पर्यटन व्यवसाय अडचणीत

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Project) व राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्प म्हणजे एक स्वतंत्र अर्थचक्र आहे.
राज्यातील मिनी लॉकडाऊन मुळे ताडोबातील पर्यटन व्यवसाय अडचणीत
Tadoba Andhari Tiger ProjectSaam TV

चंद्रपूर: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) कहर सुरू झाला आहे. कोविडच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही कोरोना फैलावत असताना राज्य सरकारने ताडोबासह (Tadoba) पर्यटन स्थळांवर बंदी घातली. हजारो लोकांना रोजगार देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प तातडीने बंद केल्याच्या निर्णयावर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांनी कठोर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हा प्रकल्प तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Project) व राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्प म्हणजे एक स्वतंत्र अर्थचक्र आहे. गेली दोन वर्षे हे संपूर्ण अर्थचक्र कोरोना निर्बंधांमुळे विपरीत स्थितीत आहे. हजारो पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी आतुरले असताना राज्य सरकारने (Maharashtra Government) तिसरी लहर पाहता तडकाफडकी निर्णय घेत ताडोबा सफारीवर बंदी घातली. यामुळे गेली दोन वर्षे ठप्प झालेल्या या व्यवसायांवर पुन्हा एकदा बंदीची कुऱ्हाड कोसळली आहे.

Tadoba Andhari Tiger Project
Rajesh Tope: राज्यातील लॉकडाऊन अन् शाळा सुरु करण्याबाबत टोपे म्हणाले...

ताडोबा व परिघातील हॉटेल- रिसॉर्ट- जिप्सी चालक- गाईड व इतर छोट्यामोठ्या व्यवसायांना याचा मोठा फटका बसणार आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगभरातील व्याघ्रपर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. दोन वर्षे या सर्व संकटातून जात असताना आता गेले अडीच महिने हे अर्थचक्र हळूहळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती. त्यातच नवे निर्बंध निर्माण झाल्याने यावर पोट असलेल्या स्थानिकांनी ही बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे.

ताडोबातील पर्यटन म्हणजे अर्थचक्राला चालना आहे. देशातील इतर सर्व पर्यटनस्थळे कोरोना नियमांचे पालन करून जारी असताना राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याची थेट प्रतिक्रिया चंद्रपूरचे खासदार व राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत चर्चा करत ही बंदी उठविण्याची मागणी केली आहे.

ताडोबा प्रकल्पात येऊ पाहणाऱ्या हजारो पर्यटकांनी तडकाफडकी बुकिंग रद्द केल्याने महसुलावरही मोठा परिणाम पडणार आहे. यामुळेच सर्व नियम पाळून ताडोबातील व्याघ्रदर्शन सफारी सुरूच ठेवण्याची मागणी आता वेगाने पुढे येत आहे. राज्य सरकार या मागणीला कसा प्रतिसाद देते, हे या पुढच्या काळात दिसणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.